सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी वासोळ ता. देवळा येथील लोकनियुक्त सरपंच स्वप्नील भाऊसाहेब अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शामराव हिरे यांनी अहिरे यांना नुकतेच नियुक्ती पत्र दिले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढविण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्वल कराल, असा विश्वास पत्रकात नमूद करण्यात आला आहे.
Deola | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात: दोन जण जखमी
“पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहणार”- स्वप्नील अहिरे
यावेळी नवनियुत युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील अहिरे म्हणाले कि, आगामी काळात आपण गाव तेथे शाखा स्थापन करून युवकांचे संघटन करण्यावर भर देणार असून, पक्षाचे ध्येय धोरणे तळागातील जानतेपर्यंत पोहचून व सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबिरपणे उभे राहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जोमाने कामकाज करण्यावर भर देणार आहे.
Deola | खालप येथील गुळ खांडसरी उद्योग सुरू; महंत गणेशपुरी महाराजांच्या हस्ते अग्नी प्रज्वलन संपन्न
अहिरे यांच्या नियुक्तीचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, मविप्रचे संचालक विजय पगार, माजी संचालक डॉ. विश्राम निकम, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, प्राचार्य हितेंद्र आहेर, माजी सभापती उषाताई बच्छाव, वैशाली खोंडे आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम