MSRTC | विमान प्रवासात जशा आदरातिथ्य व व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या ‘एयर होस्टेस’ असतात, तशाच हवाई सुंदरींप्रमाणे आता ई-शिवनेरी बसमध्ये आपल्याला शिवनेरी सुंदरी पाहायला मिळणार आहेत. एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरीची’ नेमणूक करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीत ही घोषणा केली असून या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. महादेव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
बसमध्ये ‘परिचारिका सेवा’ देणार महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य
एसटी मंडळाची 304 वी संचालक बैठक महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध खात्याचा तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा झाली असून त्यांना मान्यता देण्यात आली आहे. यातच मुंबई पुणे महामार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी परिचारिका नेमण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
सोलापुरात MSRTC बस पलटी, 30 जण जखमी, मुख्यमंत्री शिंदेंची मदतीची घोषणा
बस तिकीट दरात वाढ नाही
त्यात विशेष म्हणजे ‘शिवनेरी सुंदर’ची नेमणूक केल्यानंतर देखील शिवनेरीच्या बस तिकिटात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. तर, बैठकीत नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बस मध्ये रूपांतरित करण्याच्या विषयांना देखील मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विक्रीसाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून 10×10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम