Nashik News | बहुप्रतिक्षित राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर जाहीर होण्याची शक्यता असून यात भाजपाकडून माजी आमदार बाळासाहेब सानप, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले तसेच शिवसेना शिंदे गटाकडून उपनेते अजय बोरस्ते यांची नावे सध्या चर्चेत आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये भाजपच्या 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या 3 तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 आमदारांचा समावेश असणार आहे. यापूर्वी तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने आमदारांची यादी निश्चित करून ती तात्कालीन राज्यपालांकडे पाठवली होती. परंतु राज्यपालांनी यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
Nashik News | ट्रेकिंगसाठी हरिहर गडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; व्हिडिओ व्हायरल
घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी निश्चित
राज्यात जुलै 2022 मध्ये महायुती सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी आपोआपच निकाली लागली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकी आधी ही यादी या जागांवर नियुक्ती व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असून महायुतीतील घटक पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची यादी अंतिम केली जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीला फायदा होईल अशाच पद्धतीने ही 12 नावे निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे विशिष्ट समाजाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी निवडणुकीसाठी रणनीती करण्यासाठी मदत करणारे तसेच आक्रमक प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची या यादीत निवड करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
यादीतील ही नावे चर्चेत
नाशिक पूर्व मतदार संघाततील माजी आमदार बाळासाहेब सानप तर आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या चित्रा वाघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नावे भाजपाकडून चर्चेत आहेत. तर उपनेते अजय बोरस्ते, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावे शिवसेना शिंदे गटाकडून चर्चेत आहेत. तसेच मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे, रूपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि माजी खासदार आनंद परांजपे ही नावे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चर्चेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम