सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | दहिवड-रामनगर ते दहिवड-उमराणे रोड रस्त्यावर असलेल्या साईड पट्ट्यावरील दुतर्फा काटेरी झुडपे प्रशासना मार्फत तात्काळ हटविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याने दहिवड येथील ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी सोमवारी (दि. ३०) रोजी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले.
Deola | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
दहिवड येथे हनुमान मंदिर समोर उपोषण सुरू केले होते
तालुक्यातील दहिवड-रामनगर ते दहिवड-उमराणे रोड रस्त्यावर असलेल्या साईड पट्ट्यावरील दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढण्यात यावीत या मागणीसाठी संजय दहिवडकर ग्रामविकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दि. ३० रोजी दहिवड येथील हनुमान मंदिरासमोर उपोषण सुरु केले होते. याची प्रशासनाने दखल घेऊन स्थळी भेट देत उपोषण कर्त्यांना तात्काळ काम सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने दुपारी उपोषण मागे घेण्यात आले.
Deola | माझी वसुंधरा अभियानात देवळा नगरपंचायतीचा प्रथम क्रमांक
यावेळी इवदचे उपअभियंता आर. आर. बाविस्कर, शाखा अभियंता जे. बी. सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष दहिवड रामनगर उमराणे रस्ता सुरक्षाची पाहणी करून जेसीबीद्वारे कामकाज सुरू केले. याप्रसंगी संजय दहिवडकर, कृष्णा पवार, श्रावण पवार, दगडू सोनवणे, सचिन सोनवणे, सुपा पिंपळसे, गंगाधर खैरनार, सचिन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर सोनवणे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम