Nashik News | नाशिक येथे हरिहर गडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची थरारक घटना घडली. हिमऑरडील या ट्रेकिंग संस्थेमार्फत हरिहर गड परिसरातील प्रसिद्ध शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. परंतु वेळीच योग्य खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मधमाशांनी हल्ला करताच ट्रेक लीडरने वेळेत खबरदारी घेत सर्वांना जमिनीवर झोपण्यास सांगितले व कुठल्याही प्रकारची हालचाल न करण्याच्या सूचना दिल्या. ज्यामुळे अनर्थ टळला. सुमारे 20 ते 25 मिनिटे मधमाशा पर्यटकांवर घोंघावत होत्या. तर या हल्ल्यामध्ये काही पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.
दुपारी 11:30 ते 12:00 वाजेच्या दरम्यान घडली घटना
या घटनेविषयीची अधिकची माहिती अशी की, रविवारी नाशिक येथून हिमऑरडील या ट्रेकिंग संस्थेतर्फे हरिहर गड परिसरातील सुप्रसिद्ध असा शीतकडा धबधबा बघण्यासाठी काही पर्यटक गेले असता, दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान मधमाशांनी अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार-पाच ट्रेकर किरकोळ जखमी झाले असून ट्रेक लीडर व त्याच्या संपूर्ण टीमने योग्य वेळी खबरदारी घेत सर्वांना जमिनीवर झोपण्यास सांगितले व आहे त्या स्थितीत कुठलाही प्रकारची हालचाल न करण्याच्या सूचना दिल्या. ज्यामुळे पुढील अनर्थाला सुमारे 20 ते 25 मिनिटे या मधमाशा पर्यटकांभोवती घोंगावत होत्या.
Nashik News | नाशकात नवरात्रोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
या हल्ल्यावेळी प्रसंगावधान दाखवत ट्रेक लीडर चेतन शिंदे व सहकारी महेश जाधव, राजश्री चौधरी, संकेत जाधव यांनी पर्यटकांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच गिर्यारोहक महेश जाधव यांना असा अनुभव असल्याने त्यांनी सोबत आणलेल्या वेखंडाच्या पावडरचा वर्षाव पर्यटकांच्या अंगावर करत मधमाशांना दूर केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम