Pune | पुण्यामधील सिविल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा पुण्याचा दौरा रद्द झाला आणि हे उद्घाटन लांबणीवर पडले परंतु यामुळे पुण्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप करत शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी या मेट्रो मार्गाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन केले असून यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले गेले. यावेळी नरेंद्र मोदी हा अशा घोषणा देण्यात आले.
Pune Muk Morcha | भर पावसात शरद पवारांचे तोंडाला काळा मास्क लाऊन ‘मुक आंदोलन’
आंदोलन करताना आजच्या आज मेट्रो स्टेशन उद्घाटन करा व अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी स्टेशनच्या आत घुसण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेल्या पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. ज्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. “जोपर्यंत मेट्रो सुरु होणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही.” अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून स्टेशन बाहेरील वातावरण तापल्याचे चित्र होते.
मेट्रो कोणाच्या बापाची नाही
“आम्ही एवढा टॅक्स भरतो तरीदेखील या गोष्टींसाठी आम्हाला त्रास का देता. ही मेट्रो आमच्या पैशातून सुरू झाली आहे. कोणाच्या बापाची नाहीये. त्यामुळे पुण्याच्या जनतेला वेठीस धरू नका. तुमच्याकडे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन का केले नाही? असा संतप्त सवाल विचारत कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली आहे. तसेच ही मेट्रो लोकांसाठी आहे त्यामुळे ताबडतोब ही मेट्रो सुरू केली पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. अशी प्रतिक्रिया आंदोलन करता महिलेने दिली.
Pune Car Accident | धनिकपुत्राने दोघांना चिरडले, निबंध लिहण्याची शिक्षा; A टु Z स्टोरी
हा पुणेकरांचा अपमान
“पावसाला घाबरून मोदी पुण्यात येत नाहीत, हा पुणेकरांचा अपमान असून हा अपमान आम्ही कधीच विसरणार नाही. मेट्रो सेवा प्रवाशांसाठी लवकरात लवकर सुरू झालीच पाहिजे. ही आमची मागणी आहे. तुमच्यामध्ये दम नाही, पण आमच्या मध्ये आहे.” असे म्हणते एका कार्यकर्त्याने संतप्त प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम