Rohidas Patil | काँग्रेसवर शोककळा; ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

0
114
#image_title

Rohidas Patil | राज्य सरकारमधील माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रोहिदास पाटील आजारी होते. आज सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी आपल्या वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसच्या काळात रोहिदास पाटलांनी विविध मंत्रीपद भूषवली होती. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील हे रोहिदास पाटलांचे सुपुत्र आहेत.

Congress Survey | महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येणार?; सर्वेमध्ये झाला मोठा खुलासा

अक्कलपाडा धरण बांधण्यात पुढाकार

रोहिदास पाटील यांची उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते अशी ओळख होती धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांनी पुढाकार घेतला होता. तसेच धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

Congress MLA | नाशकात राजकीय घडामोडींना वेग; ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर..?

तर उद्या सकाळी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रोहिदास पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रोहिदास पाटील यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना आणि नातवंड असा परिवार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here