Deola | रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ % लाभांश- चेअरमन विनोद शिंदे

0
47
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मागणीनुसार सभासदांना यावर्षी ९ % लाभांश देण्यात येणार असून, थकबाकीदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज वेळेत भरून कायदेशीर कारवाई टाळावी संस्थेच्या वतीने यापुढे कर्ज वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले जाणार असल्याची माहिती चेअरमन विनोद शिंदे यांनी दिली.

Deola | सटवाईवाडी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

संस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

या संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दि. २६ रोजी डॉ. दौलत राव आहेर सभागृह दुर्गा माता मंदिरात खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी ते बोलत होते. संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे: सभासद – १८४१, अधिकृत भागभांडवल १ कोटी ८० लाख, वसूल भागभांडवल १ कोटी ५६ लाख ९६ हजार ५००, एकूण ठेवी ११ कोटी १९ लाख ५३ हजार ७९५, कर्ज वाटप ८ कोटी ८ लाख ७९ हजार ४३९, गुंतवणूक ८ कोटी ३९ लाख ३५ हजार ६६१, स्वनिधी ३ कोटी ४७ लाख ७८ हजार ५७८, खेळते भांडवल१८ कोटी १९ लाख ८ हजार , नफा ३१ लाख ११ हजार ९६०, थकबाकी नगण्य असून शसीडी रेशो ६० टक्के याप्रमाणे आहे.

संस्थेच्या प्रगतीसाठी कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा

वार्षिक सर्वसाधारण सभेत कर्ज वसुलीवर भर देण्यात आला. थकबाकी दारांवर तात्काळ जप्तीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. येत्या तीन महिन्यांत याकामी कारवाई करण्याचे आश्वासन चेअरमन शिंदे यांनी दिले, तसेच पुढिल काळात सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व्हा. चेअरमन दीप्ती आहेर यांनी केले. संस्थेच्या प्रगतीसाठी कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा असल्याने याप्रसंगी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विविध क्षेत्रात निवड झालेल्या हितचिंतकांचा व सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

Deola | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील काम मागील सात महिन्यांपासून ठप्प; नागरिकांचे होत आहेत हाल

सभेत माजी चेअरमन नितीन शेवाळकर, पवन अहिरराव, अब्रार मणियार, शांताराम निकम, व्ही. एम. देवरे, दादाजी आहेर आदींनी चर्चेत भाग घेतला होता. यावेळी संचालक सुभाष आहेर, डॉ. वसंतराव आहेर, दुलाजी आहेर, सतिष राणे, अरुण खरोटे, डॉ. अविनाश आहेर, रजत आहेर, पंडित चंदन, वंदना आहेर, पंकज आहेर, विठ्ठल गुजरे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन व्यवस्थापक रवींद्र देवरे यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी राजेंद्र वनजी देवरे, अरुण जाधव, ज्ञानेश्वर मेतकर, रितेश शिंदे, शंकर नवरे प्रमोद शेवाळकर, बाळकृष्ण भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here