Deola | सटवाईवाडी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

0
67
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील सटवाईवाडी येथे बुधवारी (दि. २५) रोजी एका युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deola | देवळा येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण रोजगार मेळावा; एकशे दहा विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी

घरा शेजारील शेतात घेतला गळफास

याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सटवाईवाडी येथे बुधवार (दि.२५) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हेमंत हिरामण मेधणे (३२) या युवा शेतकऱ्याने आपल्या घरालगतच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. मयत मेधने याच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून, या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. मेधने याच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Deola | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील काम मागील सात महिन्यांपासून ठप्प; नागरिकांचे होत आहेत हाल

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

रात्री उशिरा त्याच्यावर गावात शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सटवाईवाडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रगतीशील शेतकरी हिरामण मेधने यांचा तो मुलगा आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here