Sanjay Raut | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवले असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊतांकडून किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात आता न्यायालयाने राऊतांना दोषी ठरवले असून 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार दंड ठोठावला आहे. यानंतर आता संजय राऊत याप्रकरणी पुढे काय भूमिका घेतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sanjay Raut | “…म्हणून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला”; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
नेमके प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत कडून करण्यात आला होता. राऊत यांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना वर्तमानपत्रातील लेखात ‘मेधा सोमाया यांनी राजकीय ताकदीचा वापर करून मीरा-भाईंदर परिसरातील 154 पैकी 16 शौचालय बांधण्याचे कंत्राट घेतले व या कंत्राटाचा वापर करून 3 कोटी 90 लाखांचा घोटाळा केल्याचे आरोप त्यांनी केले होते. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी माझगाव न्यायालयात मानहानीचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता याच खटल्यात संजय राऊतांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम