Tribal Reservation | गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक हे आदिवासी आरक्षण आणि ‘पेसा’ भरती या आंदोलनाचे केंद्र बनले असून आता पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. सध्या राज्यामधील 17 जिल्ह्यांमध्ये ‘पेसा’ कायद्यान्वये होणारी भरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून ही भरती तात्काळ सुरू करावी. या मागणी करिता आंदोलन सुरू असून यात आता आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादाने भर घातली आहे.
Kavita Raut | ‘आदिवासी म्हणून माझ्यावर…’; ऑलम्पिक धावपटूला नोकरीसाठी डावलले
तेव्हा आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील आदिवासी आणि आदिवासी लोकप्रतिनिधी संघटित होऊन होऊ लागले असून त्यांनी आता थेट महायुतीलाच टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही. असे म्हणत धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याचे जाहीर केल्याने सध्या आदिवासी घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तेव्हा आता आदिवासी आणि धनगर समाजाच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा विषय दाखल झाला आहे.
विरोधकांच्या हातात आयते कोलीत
या संदर्भात आता विरोधकही सरकारवर निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आदिवासी आंदोलनाचे नेते जे. पी. गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांच्यासह विविध नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार भगरे यांनी थेट रस्त्यावर बसून तासभर घोषणा देत आंदोलन केले. त्यामुळे आता ह्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
मागील महिन्यात ‘पेसा’ कायद्याच्या भरतीबाबत आंदोलन मिटवण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुढाकार घेत आदिवासी आंदोलकांच्या 21 नेत्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांना आठ दिवसात याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासनही दिले गेले होते. मात्र महिना उलटून केला असला तरी त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांची नाराची वाढली असून आता या प्रश्नावर थेट राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
Dhangar Reservation | धनगर आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; सह्याद्री आदितीगृहावरील बैठक संपन्न
मुख्यमंत्री सोमवारी घेणार बैठक
आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता सोमवारी सकाळी आदिवासी लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बैठक पार पडणार असून या बैठकी धनगर समाजाला आदिवासी बांधवांच्या आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध करण्यात येणार आहे. आदिवासी लोकप्रतिनिधी आपली भावना आणि भूमिका यावेळी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट करणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम