Deola | देवळ्यात मोठ्या उत्साहाने गणेश विसर्जन सोहळा संपन्न

0
11
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा शहर व तालुक्यात गणेश विसर्जन मोठ्या भक्तिभावाने शांततेत पार पडले. देवळा नगरपंचायतीने पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी नगरपंचायत कार्यालयासमोर तसेच देवळा पोलिसांनी देखील लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारले होते. त्याला गणेश भक्तांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

Deola | देवळा कळवण रोडवर दोन वाहनांच्या धडकेत तरुण जागीच ठार

देवळा शहरात सुभाष रोड गणेश मित्रमंडळ, कळवण रोडवरील गणेश मंडळानी तसेच गावागावातील मंडळांनी सत्यनारायण महापूजा, महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी मिरवणुका काढण्यात आल्या. यात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. यावर्षी तालुक्यात समाधान कारक पाऊस झाल्याने छोटे मोठे पाझर तलाव, बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्राला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे रामेश्वर येथील किशोर सागर, वार्षि धरणात व गिरणा नदीपात्रात मोठ्या गणेश मंडळांनी आपल्या मोठ्या व घरगुती गणेश मूर्ती याठिकाणी विसर्जित केल्या. किशोर सागर व गिरणा नदीपात्रात भाविकांची गर्दी दिसून आली.

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या पाणी पाऊस घेऊन या” 

शहर व परिसरात गणेशभक्तांनी वाद्यवृंदाच्या गजरात नाचत मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या, पाणीपाऊस घेवून या’ चा गजर करत लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात, रामेश्वरच्या किशोरसागर धरणात तसेच स्थानिक तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ट्रॅक्टर, रिक्षा, टेम्पोवर ठेवलेल्या मोठ्या गणेशमूर्तींना आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. मंडळांनी गुलालाची उधळण करत मिरवणुकांत रंग भरला असला तरी येथील निमगल्ली मंडळाने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. कळवण रोडचा राजा शिवराजे गणेश मित्र मंडळाच्या मिरवणुकीत युवावर्गाचा सहभाग लक्षणीय होता. जयहिंद मंडळ, मालेगाव रोड गणेश मंडळ, ज्ञानेश्वरनगर मधील शिवतेज मंडळ, गुंजाळनगर व इतर उपनगरातील लहानमोठ्या गणेश मंडळांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. सुभाषरोड मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात संपन्न झालेल्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

Deola | स्व. कु. आरोही आहेर व स्व. चि. सार्थक शिवदे यांच्या स्मरणार्थ नांदुरी आश्रम शाळेत अन्नदान

गणेश मूर्ती ठेवण्यासाठी बाकांची व्यवस्था होती

लहान मूर्तींचे विसर्जन गावागावात झाले असले तरी मोठ्या मूर्तींचे विसर्जन लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात करण्यात आले. लोहोणेर येथे नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे सुलभ जावे म्हणून सटाणा येथील श्रीहरिओम नागरी सहकारी पतसंस्था सटाणा, श्री. किशोर भांगडिया मित्रमंडळ सटाणा व लोहोणेर-ठेंगोडा ग्रामस्थ यांनी क्रेन व तराफा यांचे सुयोग्य नियोजन केले होते. गणेशमूर्ती ठेवण्यासाठी व आरती करण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आल्याने नियोजनात सुसूत्रता होती. यामुळे कोणतीही दुर्घटना न होता, गणपती मूर्तींचे खोल पाण्यास विसर्जन करायला मदत झाली. ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत लोहोणेर यांच्याकडून नदीपात्रात प्रदूषण होऊ नये याच्यासाठी ट्रॅक्टर द्वारे प्लास्टिक संकलन, मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुका व विसर्जन शांततेत पार पडले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here