Deola | देवळा कळवण रोडवर दोन वाहनांच्या धडकेत तरुण जागीच ठार

0
19
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा कळवण रोडवरील भऊर फाट्यावर मंगळवारी (दि.१७ )रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात खर्डे ता. देवळा येथील तरुण नितीन बाजीराव जाधव (२३) हा जागीच ठार झाला. देवळा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deola | स्व. कु. आरोही आहेर व स्व. चि. सार्थक शिवदे यांच्या स्मरणार्थ नांदुरी आश्रम शाळेत अन्नदान

वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघातात

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल मंगळवार (दि. १७ ) रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास खर्डे ता. देवळा येथील नितीन जाधव (२३) हा युवक आपल्या दुचाकीने घरी येत असताना देवळा कळवण रोडवरील भऊर फाटा नजीक बागलाण तालुक्यातील बँड पथकाचे वाहन वाहतुकीचे नियम न पाळता रस्त्यावर उभे असताना याची जबर धडक नितीन जाधव याला बसल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच स.पो.नि. दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या बँड पथकाच्या वाहनाला ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला.

Deola | खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेत गावात यंत्राद्वारे धुरळणी करण्यात आली

खर्डे गावावर शोककळा

अपघातात तरुण ठार झाल्याने खर्डे गावावर शोककळा पसरली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर वाहन चलविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मयत नितीन जाधव वर देवळा ग्रामीण रुग्णालयात आज बुधवारी (दि. १८) रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here