Ajit Pawar | अजित पवारांनी पत्नी सुनेत्र पवार यांच्या समवेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अखिल मंडई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आम्ही पहिल्यांदा महायुती सरकार आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच महायुती सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar | लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांनी केलेल्या विधानावर अजित पवारांच प्रतिउत्तर
काय म्हणाले अजित पवार
मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारले असता मुख्यमंत्रीपद गाठण्यासाठी 145 चा मॅजिक आकडा पार करावा लागतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटत असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा पण सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही. त्यातही कोणाला मत द्यायचे हे मतदार राजाच्या हाती असते. असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले.
Ajit Pawar | पक्षनेत्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा; NCP लढवणार इतक्या जागा?
त्याचप्रमाणे राज्यभरात जनतेने अतिशय उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं आणि आज बघता बघता विसर्जनाची विसर्जनाचा दिवस उजाडला. बापाला निरोप देताना मन थोडं जड झाला आहे. यावेळी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” एवढ म्हणावसं वाटतंय. आतापर्यंत सर्वांनीच चांगले काम केले आहे. विसर्जनाच्या दिवशी देखील प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी सर्वांना केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम