BJP | पुण्यामध्ये भाजपाला धक्का; आणखी एका नेत्याने ‘तुतारी’ फुंकली

0
64
#image_title

BJP | राजकारणात जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या मिरवणुका बाहेर निघाल्या असून गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. तर भाजपला मात्र विसर्जनाच्या मौक्यावर मोठा फटका बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेत्याने तुतारी हाती धरली आहे. निवडणुकांच्या तोंडावरती नेते पक्ष सोडून जात असल्याने भाजपाच्या चिंतेत आता वाढ झाली आहे.

BJP | भाजपाला आणखीन एक फटका; विदर्भातील बड्या नेत्याची कॉंग्रेसमध्ये घरवापसी

भाजपा नेते बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला असून बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सव सुरू असताना एका गणपती मंडळामध्ये आगामी काळातील निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी “तुतारीला मतदान करा” असे आवाहन देखील केले होते आणि आता अखेर गणपती विसर्जना दिवशी माजी आमदार बापूसाहेब पठारेंनी तीन माजी नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश आज पार पडला.

BJP | भाजपला मोठा फटका; बावनकुळेंच्या विधानाने चर्चांना उधान

बापूसाहेब पठारे नेमके कोण

2009 मध्ये बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी काँग्रेस तिकिटावर विधानसभेला निवडून आले. त्यानंतर 2014 साली भाजपच्या जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला. निवडणुकीवेळी पक्षात झालेल्या गटबाजीमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 मध्ये भाजपकडून मुळीक यांनाच उमेदवारी देण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here