Sanjay Raut | नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील एक कार्यक्षम व लोकप्रिय नेते असून त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. नुकताच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेले नितीन गडकरी यांच्याकडून एक मोठा दावा करण्यात आला. लोकसभा निवडणुकी पूर्वी त्यांना पंतप्रधान पदासाठी ऑफर दिली गेली असल्याचे या दाव्यातून समोर आले. विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याकडून ही ऑफर दिली गेली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले परंतु मला या पदाची इच्छा नाही असे सांगत मी ती नाकारले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या याच दाव्या नंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा वक्तव्य केला आहे.
Sanjay Raut | इंग्लंड रिटर्न राऊतांनी स्वदेशी परतताच विरोधकांना घेरले
नितीन गडकरींनी हे वक्तव्य नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केले. लोकसभा निवडणुका दरम्यान विरोधी पक्षातील एका वरीष्ठ नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्याच्या या वक्तव्यावर राऊतांनी “यात काही चुकिचे नाही असे मला वाटते” असे म्हटले.
काय म्हणाले संजय राऊत
नितीन गडकरी हे भाजपमधील एक सर्वसामान्य नेते आहेत. तेव्हा त्यांना पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असे कोणी सांगितले असेल असे मला वाटत नाही मुळात सध्या देशांमध्ये हुकूमशाही एकाधिकारशाही सुरू असून मागील दहा वर्षांपासून देशांमध्ये आणीबाणी लावण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे त्याच्यामध्ये तडजोड करू नका अशी भूमिका विरोधी पक्षाकडून त्यांच्यासमोर मांडण्यात आली असेल तर त्यात काही वावग आहे असे मला वाटत. सत्तेमध्ये बसून देशातील मूल्यांची तडजोड करणं हा एक राष्ट्रीय अपराध आहे.
Dada Bhuse on Sanjay Raut | राऊत सर्वात मोठा डोमकावळा, घाबरतो का मी…; भुसेंचा राऊतांवर पलटवार
नितीन गडकरी कायमच या सगळ्याच्या विरोधात बोलत राहिले आहेत. तेव्हा या संदर्भात एखाद्या विरोधी पक्ष नेत्याने सल्ला दिला असल्यास फार त्रास होण्याचे कारण नाही.1977 साली जगजीवन राम यांनी देखील काँग्रेस मधून याच कारणासाठी बंड केला होता. देशामध्ये लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी सत्तेचा त्याग करावाच लागतो”. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम