Deola : देवळा येथील बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेने केलेल्या कामगिरीचे मुंबईतील राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेनं दोन महिन्यांच्या अल्प कालावधीमध्ये दीड कोटींहून अधिक ठेवी जमा करून सभासद व ठेविदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. ही बाब अभिमानास्पद आहे. असे म्हणत डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी संस्थेस दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी सांगितले.
Deola | लोहणेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषाबाई सोनवणे यांची बिनविरोध निवड
आयुक्तांकडून संस्थेच्या कामकाजाचा घेण्यात आला आढावा
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी देवळा येथील बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर देखील उपस्थित होते. यावेळी आयुक्त सूर्यवंशी यांनी संस्थेचे अध्यक्ष पवन अहिरराव यांच्याकडून संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये पतसंस्थेने सर्वसामान्य व्यापारी तसेच लहान व्यवसायिकांना 80 लाखांच्या आसपास कर्जवाटप केल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
Deola | केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त न्हनावे येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवन अहिरराव, संचालक नितीन शेवाळकर, उपाध्यक्ष मोहीनुद्दिन पठाण, दत्तात्रय देवरे, डॉ. पंकज निकम, धनंजय आहेर, निखिल आहेर, योगेश शेवाळे, प्रवीण अलई, ज्ञानेश्वर सावळे, धनंजय राजवाडे, वंदना आहेर, शांताराम निकम, वैजनाथ देवरे, सुषमा खराटे, विजय आहेर व व्यवस्थापक हेमंत गोसावी इत्यादी मंडळी उपस्थित होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम