Deola | केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त न्हनावे येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

0
52
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  नाफेडचे राज्य संचालक व भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांचा वाढदिवस तालुकाभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी न्हनावे (ता.चांदवड) येथे गरजू विद्यार्थ्यांना 25 सायकलींचे वाटप करण्यात आले. देवळा येथे रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. याला रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शाळेत पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात घेऊन अशा पंचवीस विद्यार्थ्यांना साकलींचे वाटप केले.

Deola | खर्डे परिसरात वीजेचा लपंडाव; केदा आहेरांसह त्रस्त शेतकऱ्यांनी गाठले उपविभागीय कार्यालय

यावेळी आहेर यांनी “विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं या सारखं दुसरं समाधान नाही. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी मला वाढदिवसाच्या निमित्त मिळाली”, अशी भावना व्यक्त केली. या स्तुत्य उपक्रमाचे पाल्यांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी धनश्रीताई आहेर, योगेश गुंजाळ, शरद ठाकरे, यशवंत ठाकरे, नवनाथ ठाकरे, सुनिल कांदळकर, राजेंद्र ठाकरे, संदिप दवंडे आदीसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here