Govinda Injury Report | काल संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा (Dahihandi) उत्सव पार पडला. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई, ठाण्यात गोविंदांचा थरार पाहण्यासाठी दूरदूरून लोक येत असतात. मात्र, या जल्लोषानंतर आता दुखद बातमी समोर आली असून, मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार यंदाही मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी झाले आहेत. थरावरुन कोसळल्याने आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, या जखमी गोविंदांवर वेगेवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.(Govinda Injury Report)
Deola | देवळ्यात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन; खान्देशी स्टार लावणार हजेरी
Govinda Injury Report | दोन गोविंदांची प्रकृती चिंताजनक; दोन बालगोविंदाही गंभीर जखमी
लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या या उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगते आणि यातच दरवर्षी अनेक गोविंदा हे मोठ्या प्रमाणावर जखमी होत असतात. मुंबई (Mumbai) महापालिकेच्या अहवालानुसार, मुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एकूण 238 गोविंदा जखमी झाले असून, ठाण्यात 19 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. यापैकी 2 गोविंदा गंभीर जखमी असून, त्यापैकी 204 गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी दोन गोविंदांची प्रकृती चिंताजनक असून, सेंट जॉर्जेस रुग्णालयातीलही दोन बालगोविंदाही गंभीर जखमी आहेत. मुंबईत एकूण 238 तर ठाण्यातीलही 19 गोविंदांची नोंद झाली आहे.
दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या २० वर्षीय गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम