NCP Leader | काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची प्रकृती चिंताजनक

0
84

NCP Leader : काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज सकाळीच अकस्मात निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर आज रात्री तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, यानंतर आणखी एक चिंताजनक बातमी राजकीय वर्तुळातून समोर आलली असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची प्रकृती अचानकपणे खालावल्याने त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दिकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. फूड पॉइझनिंग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Vasant Chavan | महाराष्ट्रात काँगेसवर शोककळा; नांदेडच्या खासदारांचे निधन

NCP Leader | ‘जनसन्मान’ यात्रेनंतर प्रकृती खालावली

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून राज्यामध्ये ठिकठिकाणी सभा बैठका व मिरवणूक यात्रांचे आयोजन केले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही जनसन्मान यात्रेचे आयोजन केले गेले होते. ही जनसन्मान यात्रा 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे दाखल झाली होती. यावेळी या जनसन्मान यात्रेमध्ये बाबा सिद्दिकी यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यानंतरच त्यांची प्रकृती ढासाळली.

Jansanman Yatra | देवळ्यातील जनसन्मान यात्रेतून राष्ट्रवादीच्या नव्या कारकीर्दीचा ‘उदय’

त्यांना लगेचच मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. तसेच आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये बाबा सिद्दिकी यांच्याबरोबर त्यांचे पुत्र झीशान सिद्दिकी देखील उपस्थित होते. या यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या यात्रेनंतरच बाबा सिद्दिकी यांची प्रकृती खालावली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here