पूजापाठ करणाऱ्या पुरोहिताने रोखला दुसऱ्यावर गावठी कट्टा

1
38

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकच्या हिरावाडी येथे पूजा पाठ करणाऱ्या पुरोहितांमध्येच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकचे त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आणि तीर्थक्षेत्र म्हणजे अतिशय शांततामय आणि पवित्र वातावरण. मात्र त्र्यंबकेश्वर येथे बऱ्याच वेळा इथल्या पुरोहितांमध्येच थेट हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.

आता त्र्यंबकेश्वर येथे यजमान पळवून नेला या प्रकरणावरून आता पुन्हा  पुरोहितांच्या दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. आणि याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे सदैव विविध पूजा होत असतात. आणि या पूजा करवून घेण्यासाठी अनेक भक्तगण येत राहतात. आणि याच प्रकारे पूजेसाठी आलेल्या यजमानांना पळवण्याच्या कारणावरून ही हाणामारीची घटना घडली.

पूजा करण्यासाठी त्र्यंबक येथे अनेक पुरोहित उपलब्ध असतात. जे पूजेसाठी येणाऱ्या यजमानांना हवी ती पूजा करवून देतात. मात्र पूजा कोणी करवून द्यायची? हे निश्चित नसते. त्यामुळे प्रत्येकाचीच संबंधिताने आपल्याकडून पूजा करवून घ्यावी ही इच्छा असते. याच इच्छेच्या कारणास्तवच थेट पुरोहितांमध्येच हाणामारी झाली.

ही हाणामारीची घटना नाशिकच्या हिरावाडी येथे घडली. यजमानाला त्र्यंबक येथे पूजेसाठी पळवले, अशा कारणाने ही हाणामारी झाली. ज्यात एकाने थेट गावठी कट्टा बाहेर काढत दुसऱ्या पुजाऱ्यावर रोखला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून घेत, यात हस्तक्षेप केला. यातील पुजाऱ्याच्या मोटारीची तपासणी केली असता, पुजाऱ्याकडे गावठी कट्टा, अकरा जिवंत काडतूसं आढळून आली.

देव-ध्यानाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याकडे नेहमी पुजेचं साहित्य असतं. मात्र इथे प्रकरण वेगळेच निघाले. इथे पुजाऱ्याकडे थेट गावठी कट्टा, जिवंत काडतुसं आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

ही बातमी वाचलीत का?

नाशिकच्या आनंदवली हत्या प्रकरणातील दोघा जणांना जामीन मंजूर झाला आहे. बाळासाहेब कोल्हे आणि जिम्मी राजपूत अशा दोघांना जामीन मिळाला आहे.

नाशकात हत्येच्या घटनांत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. गुन्हेगारांच्या या बिंधास्त वागण्यामुळे, नागरिक भयभीत झालेले आहेत. यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा काही वचक राहिलेला नाही. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी गंगापूर रोड कडील आनंदवली येथे रमेश मंडलिक यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

नाशिक – हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here