Nashik News | नाशिक : नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बांग्लादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला. मात्र, संघटनांचा मोर्चा शरतील जुना नाशिक, भद्रकाली परिसरातून जात असताना मोर्चावर दगडफेक झाली. तसेच काही दुकानदारांनी दुकाने बंद न ठेवल्याने दुकानं बंद करण्यावरून आंदोलक आणि दुकानदार यांच्यात बाचाबाची आणि वाद झालयाने काहीकाळ शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
Nashik News | पालकमंत्री ॲक्शन मोडवर
या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला असून उद्या (दि.17 ऑगस्ट) रोजी दुपारी १.३० वाजता प्रशासनासोबत तातडीची बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवली आहे.
Nashik News | नाशकात सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान राडा; शहरात तणावाची परिस्थिती
नागरिकांना आवाहन
तसेच मंत्री भुसे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये, कायदा हातात घेऊन सलोखा बिघडेल असे वर्तन टाळावे, प्रशासनाला सहकार्य करून शहराची शांतता भंग होणार नाही. यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नये नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद काही आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे.
मंत्री भुसे यांनी अपोलो हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संवाद साधला असून जखमींची विचारपूस केली. यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलीस प्रशासन तसेच इतर यंत्रणा जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहेत. मात्र या यंत्रणेला नागरिकांनी देखील सहकार्य करून नाशिक शहराचे महात्म्य आणि शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.
Deola | देवळा येथे महामार्गाच्या कामाविरोधात संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत काम बंद पाडले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम