Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट; लाखो महिलांना होणार फायदा..!

0
119
Ladki Bahin Yojana
Ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana | मुंबई :   सध्या संपूर्ण राज्यात केवळ महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचीच (Ladki Bahin Yojana) चर्चा आहे. कारण 14 ऑगस्टपासून राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात या योजनेच्या लाभाचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार असून, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे यावेळी पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होत आहे. दरम्यान, यातच आता राज्य सरकारने या योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

17 ऑगस्टपर्यंत पात्र महिलांना निधी मिळणार

सुरुवातीला 15 जुलै ही अर्ज नोंदणीची मुदत देण्यात आली होती. मात्र, महिलांचा प्रतिसाद पाहता ही मुदत वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली होती. दरम्यान, या अंतर्गत 30 जुलै पर्यंत ज्या महिलांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होत आहे. 14 ऑगस्टपासून महिलांच्या काहत्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून, 17 ऑगस्टपर्यंत पात्र महिलांना निधी मिळणार आहे. तर, राज्य सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 80 लाख महिलांना सन्मान निधी मिळाला आहे आणि 1.46 कोटी महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत.

Ladki Bahin Yojana | दादांनंतर आता ‘देवाभाऊ’ राखी पौर्णिमेला येणार लाडक्या बहीणींच्या भेटीला

Ladki Bahin Yojana | 80 लाख महिलांना निधीचे वितरण

14 ऑगस्टपासून निधी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून, 14 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत 32 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली. 15 ऑगस्टला पहाटे 4 वाजेपर्यंत ही संख्या  48 लाखांपर्यंत होती. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना निधीचे वितरण केले आहे.

अर्ज भरण्यासाठी कुठलीही अंतिम मुदत नाही 

या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, आता महिलांचा वाढता प्रतिसाद आणि अजूनही मोठ्या संख्येने अर्ज जमा होत असल्याने 31 ऑगस्टपर्यंतची मुदत रद्द करून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 31 ऑगस्टनंतर अर्ज केरणाऱ्या महिलांचे अर्ज ग्राह्य धरले जातील. आता कुठलीही अंतिम मुदत या योजनेसाठी नसणार आहे.

Ladki bahin yojana | लाडक्या बहि‍णींसाठी गुडन्यूज..!; ‘या’ तारखेला बँक खात्यात जमा होणार ३००० रुपये..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here