Ladki bahin yojana | राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला (Ladki bahin yojana) राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले असून, अजूनही अर्ज येत आहेत. सरकारने अर्ज दाखल करण्याची मुदत ही 15 ऑगस्टवरून 31 ऑगस्टपर्यंत करल्याने आणखी महिलांचे अर्ज दाखल होण्याचा अंदाज आहे.
योजनेचा पहिला हप्ता कधी आणि किती..?
दरम्यान, यातच आता लाडक्या बहिणींना सरकारकडून आणखी एक गुडन्यूज आली असून, त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा महिलांच्या बँक खात्यांमध्ये कधी जमा होईल. याची तारीख जाहीर करण्यात आली असून, याबाबत निर्णय झाला आहे. तर, 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये हा महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनपूर्वीच (Rakshabandhan) राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची ‘लाडकी मोलकरीण’ योजना..?
Ladki bahin yojana | मोठा गाजावाजा करत हप्त्याचे वितरण
याबाबत आज बैठकीत निर्णय झाल्याची माहिती असून, 17 ऑगस्टला पात्र महिलांना पहिला हप्ता मिळणार आहे. 17 ऑगस्टला राज्य सरकारने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून, मोठा गाजावाजा करत या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्रमात उपस्थित असतील. 17 ऑगस्टला राज्य सरकार दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. (Ladki bahin yojana)
Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार..?; बघा काय म्हणाले अजित पवार
अशी होणार छानणी प्रक्रिया
सध्या तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरून महिलांच्या दाखल अर्जांची आकडेवारी समोर येत असून, प्राप्त प्रलिंबित अर्जांतील त्रुटी दुरुस्त केल्या जाती आणि ते अर्जही मंजूर केले जातील. तर, नामंजूर अर्जदार महिलांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. (Ladki bahin yojana)
आतापर्यंत राज्यभरातून 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेचा पहिला हप्ता ररक्षाबंधनपूर्वी दिला जाणार असून, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच एकूण 3 हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्ट रोजी जमा केले जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम