Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार..?; बघा काय म्हणाले अजित पवार

0
81
Ladki bahin yojana
Ladki bahin yojana

Ladki bahin yojana |  राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही योजना राज्यभरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. (Ladki bahin yojana)

 Ladki bahin yojana | रक्कम वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजना आणल्या असून, या योजना जास्त काळ टिकणार नाही. योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असल्याच्या टिका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले असून, “अशक्य गोष्टच शक्य करून दाखवणं ही माझी ओळख आहे आणि या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार” असे ट्विट करत अजित पवारांनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojna | नाशकातून अजित पवारांचा योजनेबाबत खुलासा; तर, थेट निवृत्त होण्याचेही आव्हान 

अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख 

दरम्यान, अजित पवार यांनी एक ट्विट केलं असून, याद्वारे त्यांनी विरोधकांना फटकारले आहे. “माझी लाडकी बहीण योजना” टिकवणं शक्य नसल्याचे विरोधी पक्षांकडून सांगितले जात आहे. परंतु अशक्य गोष्टही शक्य करणं हीच माझी ओळख आणि तो माझा स्वाभिमान देखील आहे.(Ladki bahin yojana)

Ladki Bahin Yojna | लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना १५०० रुपयांसोबत ३ गॅस सिलेंडरही मिळणार

विरोधकांना ही योजना बंद पाडायची आहे 

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे आणि तसं त्यांनी स्पष्ट देखील केलेलं आहे. कारण ही योजना यशस्वीरित्या राबविणे हे अशक्य असल्याचं भाकित त्यांनी केलं आहे. मात्र, येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजनेला अधिक बळकटी देउन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी देखील मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी काम करणाऱ्यांमध्ये आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे, असं आपल्या ट्विटमध्ये अजित पवारांनी म्हटलं आहे. (Ladki bahin yojana)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here