MNS Candidate | मनसेचे दोन उमदेवार जाहीर; राज ठाकरेंकडून निष्ठावंतांना ‘निष्ठेचे फळ’

0
78
MNS Candidate
MNS Candidate

MNS Candidate : मुंबई :   लोकसभा निवडणुकीत महायुती आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी या विधानसभेला पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारली आहे. २०० ते २५० जागा लढवण्याची तयारी करत या जागांचा सर्वेही मनसेकडून सुरू असल्याचे गेल्या सभेत स्वतः राज ठाकरेंनी सांगितले होते. तर, यानंतर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौराही सुरू आहे. दरम्यान, यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. (MNS Candidate)

दरम्यान, नुकतीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होईल आणि आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनधरणी करत त्यांना महायुतीत सामील करून घेतले जाईल, असे बोलले जात होते. मात्र, याउलट आता मनसे स्वबळावरच विधानसभा लढवणार हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मनसेने आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, याबाबत मनसेने पत्रक जारी केलं आहे. यात राज ठाकरेंचे निष्ठावंत बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्यासह दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Raj Thackeray | राज ठाकरेंची घोषणा.! महायुतीसोबत काडीमोड; काहीही करून आमदारांना सत्तेत बसवणार

MNS Candidate | ‘या’ निष्ठावंतांना उमेदवारी 

दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभा मतदार संघातून (Shivadi Assembly Constituency) बाळा नांदगावकर यांना तर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेकडून मैदानात उतरवण्यात आले आहे. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे विद्यमान आमदार आहेत. आज राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत.

या मतदारसंघातून बाळा नांदगावकर एकदा पराभूत 

दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून शिवडी मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदार संघात सध्या ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार असून, ते 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सलग दोनवेळा निवडणून आले आहेत. तर, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या बाळा नांदगावकर यांना पराभूत केले होते. तर, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या संतोष नलावडे यांचा पराभव केला होता. (MNS Candidate)

Raj Thackeray | मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार..?; राज ठाकरेंनी जाहीर केलं

नांदगावकर चार वेळा आमदार 

शिवसेनेत असताना 1995-2004 या काळात मांझगाव विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर हे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत ते मनसेकडून (MNS) शिवडी मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत याच मतदार संघातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे चार वेळेस आमदार असलेल्या नांदगावकर यांचं शिक्षण हे दहावीपर्यंतच झालेलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here