Maratha Reservation | भुजबळांचं टेन्शन वाढलं; मनोज जरांगेंचे पुढील उपोषण येवल्यात..?

0
76
Maratha Reservation
Maratha Reservation

नाशिक :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नुकतेच आपले उपोषण स्थगित केले. गावकऱ्यांनी आपल्याला उपचार घेण्यासाठी आग्रह केला. सलाईन लाऊन उपोषण करण्यात काही अर्थ नाही, त्यापेक्षा सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे. ती खुर्ची ओढण्यासाठी आगामी निवडणुकांची तयारी करतो, असे म्हणत जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत तब्बल पाच वेळेस उपोषण केले असून, यावेळीही त्यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

मागील उपोषणच येवल्यात करणार होते..?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे त्यांचे पुढील उपोषण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघात म्हणजेच येवल्यात करतील, अशी चर्चा आहे. मागील उपोषणच ते अंतरवाली ऐवजी येवल्यात करणार होते. यासाठी त्यांच्या नाशिकमधील समर्थकांनी प्रचंड आग्रहदेखील धरला होता. मात्र, या आंदोलनाचा संभाव्य नकारात्मक परिणाम ओळखून त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे कळते. दरम्यान, आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागली असून, जरांगे यांनी पुढील उपोषण हे येवल्यात (Yeola) करावे, अशी मागणी करत येवला तालुक्यातील पुरणगाव व एरंडगाव खुर्द या गावांमध्ये ग्रामसभेत याबाबत ठराव मांडण्यात आल्याचे समोर आले आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation | सरकारला नवा अल्टीमेटम; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

येवल्यात उपोषणाला बसतो, मग कळेल… 

याबाबत मनोज जरांगे म्हणाले होते की, “छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे येवल्यात बसलेले आहेत. त्यामुळे आता मी येवल्यात जातो आणि उपोषणाला बसतो. छगन भुजबळ यांनीच मराठा आणि धनगर समाजात वाद लावण्याचे काम केले आहेत. येवल्यात आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितले असून, मी येवल्यात उपोषण करतो म्हणजे यांना समजेल की उपोषण काय असते, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांना दिला होता. यावरून आता येवल्यातील काही गावांनी पुढाकार घेतला आहे.

Maratha Reservation | सदावर्तेंचे प्रयत्न फेल; मराठा आरक्षणाला स्थगिती नाही

Maratha Reservation | उपोषणासाठी सर्व पुरवण्याची ग्रामस्थांची तयारी 

येवला तालुक्यातील पुरणगाव आणि एरंडगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव मांडला असून, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे पुढील उपोषण हे पुरणगावात घ्यावे, अशी मागणी करत जरांगे यांच्या या उपोषणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या व सेवा या पुरवण्याची जबाबदारी या गावांतील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दर्शविली असून, याबाबत पुरणगाव व एरंडगाव खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ठराव मांडला आहे. त्यामुळे आता यावर जरांगे पाटील काय निर्णय घेतात आणि ते खरंच येवल्यात उपोषण करणार का? हे पहावे लगणार आहे.(Maratha Reservation)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here