राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे मुंबई आग्रा हायवे रस्त्यावरिल दारणा नदी किनारी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्खमिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित विविध कार्यक्रमाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. एकादशी निमित्त हजारो भाविकांची मांदियाळी येथे दरवर्षी असते. यंदाही असा भक्तीचा मेळा भरणार आहे. माणिकखांब परिसरातील भाविकांमध्ये हे मंदिर प्रति पंढरपूर असल्याची भावना आहे.
बुधवारी (दि.१७) रोजी मंदिरात विठ्ठल नामाचा गजर होणार आहे. दहा वर्षापूर्वी चव्हाण, पाटिल या परिवारांनी एकत्र येऊन दारणा नदी तीरावर श्री विठ्ठल रुक्खमिणी मंदिर उभारले. तेव्हापासून हे देवस्थान येथील भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे. विविध धार्मिक सोहळे हे नियमित याठिकाणी सुरू असतात. भक्तांच्या सेवेतून देवालयाचे पावित्र्य हे अबाधित ठेवले आहे. आषाढी एकादशी दोन दिवसावर आल्याने मंदिराची साफ सफाई सुरू आहे.
Igatpuri | टाकेद गट शिष्टमंडळाने घेतली आमदार कोकाटे यांची भेट; विविध विकासकांमांचा घेतला आढावा
Igatpuri | एकादशीला विविध धार्मिक कार्यक्रम
आषाढी एकादशी निमित्त माणिकखांब येथे रस्त्यावरिल मंदिरात श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. भक्ताच्या मुखातून ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या जयघोषाने हा परिसर भक्तीने न्हाऊन निघणार आहे. एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता महाअभिषेक व काकड आरती, दुपारी १२ वाजता महाआरती सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, ६ वाजता आरती व रात्री ९ ते ११ भजन होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम