सर्वतीर्थ टाकेद : सिन्नर-इगतपुरी विधानसभा मतदार संघातील इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातील विविध प्रश्नासंदर्भात टाकेद गटातील शिष्टमंडळाने विकास पुरुष आमदार माणिकराव कोकाटे यांची सोमवार (ता.१५) भेट घेतली. या भेटीत टाकेद गटातील रस्ता, वीज, पाणी, मोबाईल नेटवर्क, पर्यटन आदी प्रश्नासह मंजूर कामे, प्रलंबित कामे यावर आढावा घेण्यात आला. या भेटी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी गटातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नऊ गावे, वाड्या, वस्त्या, मांजरगाव भाम धरण नदी जोड प्रकल्प अंतर्गत होणारा 25 कोटी रुपयांच्या एम.जि.पी योजनेचा पाणी प्रश्न,आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे होणारे 900 कोटी रुपयांचे स्मारक रोप वे,
टाकेद गटातील मोबाईल नेटवर्क प्रश्न, वीजेचा प्रश्न, इगतपुरी तहसीलदार कार्यालय पुरवठा विभाग सर्व टाकेद गटातील नवीन जुने रेशनकार्ड ऑनलाइन डाटा एन्ट्री इंस्टाक प्रश्न, टाकेद तीर्थ ते टाकेद गाव रस्ता, टाकेद येथील मुख्य चौकातील रस्ता प्रश्न, टाकेद ते टाकेद खुर्द रस्ता, भरवीर भंडारदरा वाडी नवीन सबस्टेशन, टाकेद भैरवनाथ मंदिर ते घोरपडे मळा रस्ता, टाकेद कातकरी नगर ते जाधववाडी धानोशी करंजी रस्ता, घोडेवाडी ते हरिओम नगर शिवार रस्ता, टाकेद येथील स्मशानभूमी रस्ता आदींसह अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा करत आढावा घेतला.
टाकेद परिसरात सौर पथदीप तात्काळ देण्यात यावे. यासंदर्भात दौलत बांबळे यांनी मागणी केली. अडसरे खुर्द येथील 25 लक्ष निधीचा हनुमान मंदिर सभामंडप, 40 लक्ष निधीचे नवीन ग्रामपंचायत कार्यालय, अडसरे खुर्द ते गंभीरवाडी रस्त्याच्या प्रश्ना संदर्भात उत्तम मोंढे आणि विनायक चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर अडसरे बु. येथील वनदेव टेकडी ते पट्टा किल्ला रोप वे पर्यटन प्रश्न, अडसरे बु. मंदिर सभामंडप, अडसरे बु. ते भंडारदरावाडी रस्ता, अडसरे करंजवाडी रस्ता आदींसह लाईटचा प्रश्न मांडला.
Igatpuri | आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिले आश्वासन
यावर संबंधित अधिकारी यांना तात्काळ प्रत्यक्षात फोन लावत. सर्व गोष्टींचा आमदार माणिकराव कोकाटे यांनी आढावा घेतला व अनेक प्रश्न तात्काळ जागेवर मार्गी लावले. यासह टाकेद गटातील वीज, रस्ता, पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावला असून टाकेद गटातील एकही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही. टाकेद गटात लेटेस्ट नवीन बजेटमध्ये सर्व शिवार रस्ते मंजूर केले आहेत. लवकरच टाकेद गटात मी दौरा घेणार आहे. टाकेद येथील सर्व रस्ते मंजूर असून, लवकर त्यांचे कामकाज येत्या आठ पंधरा दिवसात चालू करण्यात येणार आहे. आपण माझ्याकडे मांडलेले सर्व प्रश्न मी सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिले. यावेळी दौलत बांबळे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, अडसरेचे माजी सरपंच जयराम साबळे, जेष्ठ नेते उत्तम मोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण, दत्तू साबळे, सर्पमित्र विजय बांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Igatpuri | घोटी-भंडारदरा रस्ता झाला चकाचक; आ. कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे भाग्य उजळले
“नुकत्याच मंजूर झालेल्या बजेट मध्ये टाकेद गटातील एकही रस्ता,शिवार रस्ता अपूर्ण राहणार नाही,लवकरच या सर्व रस्त्यांचे कामकाज चालू होईल,प्रलंबित असलेले सर्व प्रश्न निकाली लागले असून लवकरच टाकेद तीर्थ ते टाकेद गाव व परिसरातील काँक्रीट रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल,सर्वाधिक निधी हा टाकेद गटातील रस्त्यांसाठी उपलब्ध केला आहे.” – आमदार माणिकराव कोकाटे (सिन्नर-इगतपुरी विधासभा)
“बोलल्या प्रमाणे खरोखर टाकेद गटावर आमदार माणिकराव कोकाटे यांचे विशेष लक्ष असून बोलून नाही तर करून दाखवले अशीच विकासकामे टाकेद व परिसरात सध्या चालू असून वर्षानुवर्षांचा आमचा टाकेद तीर्थ ते टाकेद गाव व चौक परिसर रस्ता प्रश्न आमदार कोकाटे यांनी कायमचा मार्गी लावला आहे.” – राम शिंदे, (सामाजिक कार्यकर्ते)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम