Chhagan Bhujbal | भुजबळ कोणाच्या इशार्‍याने बोलतात; विरोधकांकडून भुजबळांच्या नार्को टेस्टची मागणी

0
56
chhagan bhujbal
chhagan bhujbal

Nagpur News :  सध्या राज्यात मराठा ओबीसी वाद सुरू असून, या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यामागे शरद पवार असून, त्यांच्यामुळे विरोधक बैठकीला आले नसल्याचे आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या जनसन्मान सभेतून केले. दरम्यान, यावरून विरोधकांनीही त्यांच्यावर पलटवार केले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भुजबळांना चांगलेच घेरले आहे. त्यात आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

Chhagan Bhujbal | एकदा भुजबळांची नार्को टेस्ट करायला पाहिजे

छगन भुजबळ हे नेहमी त्यांच्या सोयीचं राजकारण करत असतात. त्यामुळे भुजबळ नेमके कोणासोबत आहेत आणि ते कोणाच्या इशाऱ्याने बोलतात हे तपासलं पाहिजे. यासाठी एकदा त्यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. जेणेकरून ते नेमएके कोणाच्या इशाऱ्यावर बोलतात हे स्पष्ट होईल, अशी टिका यावेळी वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळांवर केली.

Chhagan Bhujbal | ‘भुजबळसाहेब काय चुकीचे बोलले.?’; उदयकुमार आहेरांचा राणेंवर पलटवार

मराठा समाजाला गुलाल उधळायला लावला आणि फसवणूक केली 

यावेळी बोलताना सभेवर का बहिष्कार टाकला. याबाबतही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले असून, सत्ताधाऱ्यांनीच मराठा आणि ओबीसी समाजातील हा वाद निर्माण केला. मुख्यमंत्री बैठका घेतात आणि मराठा समाजाला गुलाल उधळायला लावून समाजाची फसवणूक करतात. दोन्ही समाजाला कसं नाचवता येईल आणि यावर आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल हेच काम ते करताय.

उपोषण स्थगित करताना नेमका काय मसुदा तयार केला. हे त्यावेळी विरोधकांना विश्वासात न घेता करण्यात आलं. आता मात्र ‘गले मे हड्डी लटक गई’ तेव्हा यांना सर्व विरोधकांची आठवण झाली. आपल्या पापात वाटेकरी करण्यासाठी महायुतीची ही चाल असल्याचा घणाघात यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. (Chhagan Bhujbal)

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यावर कारवाई केली जाणार

ज्या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार. मागच्या निवडणुकीतही काही लोकांची नावं आमच्या कानावर आली होती. मात्र तेव्हा आम्ही कुठलीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे यावेळी आम्ही पूर्ण अलर्ट राहून आमची रणनीती आखली होती. आमच्या पक्षात असलेली घाण आमच्या लक्षात आली असून, याबाबतचा प्रस्ताव देखील आम्ही पक्षाच्या वरिष्ठाकडे कारवाईसाठी पाठवला आहे आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरणही यावेळी वडेट्टीवार यांनी दिले. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही; भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here