सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणूकीसाठी शिक्षक मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. देवळा तालुक्यात एकूण 752 शिक्षक मतदारांपैकी 732 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण 96.83 टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले.
देवळा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लक्ष ठेवले. दुपारी चार वाजेपर्यंत 752 पैकी 663 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला होता.
Deola | नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?
देवळा-खर्डे रस्त्यावर असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, अपक्ष विवेक कोल्हे यांचे बुथ लावण्यात आले होती. यामुळे रस्त्यावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार आर.डी. निकम यांनी भेट दिली. तर, मविप्र चे संचालक विजय पगार दिवसभर येथे तळ ठोकून होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी याकामी विशेष परिश्रम घेतले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम