Deola | नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?

0
81
Nashik Teachers Constituency Election
Nashik Teachers Constituency Election

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  लोकसभेची निवडणुकीचा धुरळा शांत होतो. तोच आता नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवाराने देखील जोर धरला असून, तालुक्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीने चांगलीच रंगत आणली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे, अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत असून, सर्व उमेदवार प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. त्यांच्या समर्थकांनीही शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत असून, अंतिम टप्प्यात तिघेही उमेदवारांकडून मेळाव्याच्या माध्यमातून जेवणावळीवर भर दिला गेला.(Deola)

Nashik Teachers Constituency | इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या मैदानात थेट मुख्यमंत्र्यांची एन्ट्री

Deola | ही दराडे यांची जमेची बाजू 

दरम्यान, तिघाही उमेदवारांच्या मेळव्यांना शिक्षक मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, यात विशेष म्हणजे मागील निवडणुकीत किशोर दराडे यांनी विजय मिळविला असल्याने पाच वर्षात मतदार संघातील शिक्षकांशी संपर्क ठेऊन प्रत्येक वर्षी दिवाळी भेटीच्या निमित्ताने भेटी घेतल्या तर देवळा तालुक्यातील बहुसंख्य शाळांनाही त्यांनी संगणक साहित्य उपलब्ध करून दिल्याने ती त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

गुळवे यांना मराठा विद्या प्रसारक संस्थेचा लाभ..?

तरी नाशिक जिल्ह्यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक असलेल्या कै. गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव संदीप गुळवे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे त्यांना सत्ताधारी मराठा विद्या प्रसारक संस्थेचा किती लाभ होतो हे पहावे लागणार आहे.(Nashik Teachers Constituency Election)

Deola | विद्यार्थ्यांना गाडीतून मिरवत मेशी येथे शाळा प्रवेशोत्सव..

मविप्र कोणाच्या बाजूने उभी राहणार..?

तर तिसरे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे गेली अनेक वर्षे मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये सत्तेत असलेल्या श्रीमती. नीलिमा पवार यांचे भाचे आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक जिल्ह्यात मविप्रच्या नीलिमा पवार समर्थक मतदारांचा लाभ होणार आहे. तरी या दोन्ही उमेदवारांपैकी नाशिकमधील अग्रेसर आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा लाभ कोणाला मिळणार हेदेखील पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नीलिमा पवार आणि नितीन ठाकरे यांचीही ताकद पणाला लागली आहे. दरम्यान, आज जरी देवळा तालुक्यात तिघही उमेदवार बरोबरीने असले तरी अर्थकारणाच्या पाकिटावरच निवडणुकीचे गणित अवलंबून असणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.(Nashik Teachers Constituency Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here