Dindori | दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाच ‘आजारी’

0
65
Dindori

वैभव पगार – प्रतिनिधी : म्हेळूस्के |  दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथील राजाराम काळु कराटे यांचा वलखेड फाटा येथे अपघात झाला असून जबरदस्त जखमी झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजाराम कराटे हे दिंडोरीहुन म्हेळूस्के येथे जात असताना वलखेड फाट्यावरील स्पीडब्रेकर जवळ त्यांचा अपघात झाला. त्यांना तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार व्हावे म्हणून एका खाजगी वाहनाने त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ नाशिक येथे हलवावे लागेल, असे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे लगेचच तेथील रुग्णवाहिकेची चौकशी केली असता येथील रुग्णवाहिका आठ ते दहा दिवसापासून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आहे, असे सांगितले. त्यामुळे दुसरी खाजगी रुग्णवाहिका मिळेपर्यंत व टोल फ्री क्रमांक 108 ला कळवल्यानंतरही एक ते दीड तास ते पेशंट बेशुद्ध अवस्थेमध्ये तेथेच ठेवावे लागले. नंतर दिंडोरी गावातील एका खाजगी रुग्णवाहिकेने राजाराम कराटे यांना दिंडोरीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिंडोरी तालुका हा ग्रामीण व आदिवासी तालुका असून दिंडोरी हे तालुक्याचे व मध्यवर्ती ठिकाण आहे. परंतु तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकाच नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची हेळसांड व गैरसोय होत आहे.

Dindori Lok Sabha Result | दिंडोरीचे स्टार उमेदवार डुप्लिकेट ‘भगरे सर’ गायब..?; बघा कोण आहेत बाबू भगरे

याबाबत तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. परंतु दुसरी रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे आमचाही नाईलाज होतो, असे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. तरीसुद्धा ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे “असून अडचण नसून खोळंबा” असे असल्याचे दिसून आले. त्यामुळे वरिष्ठांनी याची त्वरित दखल घेऊन गरीब रुग्णांसाठी येथे लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Dindori | सर्पदंशावर इलाज व्हावा

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारांबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी असतात. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यास खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. ऐनवेळी मागेल तितकी रक्कम खाजगी वाहनांना द्यावी लागते. त्या वाहनांत सुविधा नसतात. तसेच दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर त्वरित उपचाराची सोय व्हायला हवी. दिंडोरी तालुका आदिवासी बहुल व शेतकरी तालुका आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना नेहमी घडत असतात परंतु त्या रुग्णांना  नाशिकला न्यावे लागते. तर, नाशिकपर्यंतचा प्रवास करेपर्यंत विषबाधा रुग्णाच्या शरीरात वाढलेली असते.

Dindori | भास्कर भगरे यांना एकलव्य भिल्ल सेनेचा पाठिंबा – रघु नवरे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here