Manoj Jarange | ‘६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात…’; जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन

0
50
Manoj Jarange
Manoj Jarange

छत्रपती संभाजीनगर :  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जुलै पर्यंतचा नवा अल्टीमेटम दिला असून, दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपले आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात (Maratha Reservation) संकटात सापडली आहे, ” असे भावनिक आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. तसेच यावेळी जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील सर्व ओबीसी नेते त्यांचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले असून, त्यामुळे मी एकटा पडलो आणि आरक्षणाअभावी मराठा जात (Maratha Reservation) संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील आणि ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे मला घेरलंय. मी एकटा पडलो असून, सत्ताधारी पक्षातील मराठे नेते आणि विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. (Manoj Jarange)

त्यामुळे जर आपल्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. आणि त्यासाठी 6 जुलैपासून सुरु होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.

Maratha Reservation | सरकारला नवा अल्टीमेटम; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

Manoj Jarange | ओबीसी नेत्यांनी सिद्ध करून दाखवलं; मराठा नेत्यांनीही..

ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे की, ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जात आणि जातीचं आरक्षण महत्त्वाचं आहे. तर, मराठा समाजाच्या नेत्यांनीही फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा केवळ आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जात आणि जातीचं आरक्षण महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. (Manoj Jarange)

त्यामुळेच आता मराठा जात संकटात सापडली असून, माझे मराठा समाजाला आवाहन आहे की येत्या 6 ते 13 जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. 6 तारखेपर्यंत समाज बांधवांनी आपली सर्व कामं उरकून घ्यावीत आणि 6 जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता आपल्या शांतता जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे.

Manoj Jarange | विधानसभा निवडणूक लढवणार..?; मनोज जरांगेंची मोठी घोषणा..!

प्रत्येक जिल्ह्यात होणार शांतता जनजागृती रॅली

तसेच त्या दिवशी कोणीही गावाच्या बाहेर किंवा लग्नकार्याला जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या शांतता जनजागृती रॅलीला ताकदीने आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय आणि आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलो असलो तरी पण मी मागे हटणार नाही. मी मेलो तरी काही हरकत नाही, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.(Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here