Nagpur Accident News | मद्यधुंद तरुणांनी फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडलं

0
43
Nagpur Accident News
Nagpur Accident News

Nagpur Accident News :  पुणे अपघात प्रकरणात अजूनही नवनवीन ट्विस्ट येत असून, हे प्रकरण चर्चेत असतानाच आता राज्याची उपराजधानी नागपूरमधूनही अशीच एक हादरवणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधील या घटनेत रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना एका भरधाव कारने चिरडले आहे. (Nagpur Accident)

दरम्यान, या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यूमुखी पडले असून, इतर सात मजूर गंभीर जखमी आहेत. यात एका चिमूरड्याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास नागपूरमधील दिघोरी नाका येथे घडली. तर, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.

Accident News: समृद्धीवर काळाचा घाला; गर्डर कोसळून 17 जणांचा मृत्यू

Nagpur Accident News | नेमकं काय घडलं..?

समोर आलेल्या अधिक माहितीनुसार, एका भरधाव इरटीका कारने नागपूरमधील दिघोरी नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले आहे. यावेळी या गाडीत भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे, आणि  ऋषिकेष चौबे हे सात जण होते आणि हे सर्व २० ते २२ वयोगटातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण आहेत. तर, ही कार सौरभ कडुकर याच्या मालकीची असून, भूषण लांजेवार ही कार चालवत होता. (Nagpur Accident News)

दरम्यान, हे सातहि तरुण वंश झाडे याच्या वाढदिवसाच्या निमित्त पार्टी करण्यासाठी नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर गेले होते. तर, हे सर्व सातही मित्र मद्यधुंद अवस्थेत असून, ते नागपूरच्या आऊटर रिंग रोड येथे फिरायला जात असताना ते दिघोरी रोड मार्गे जात होते. तर, रविवारी रात्री १२ वाजता या भागात विवाह सोहळा सुरु असल्याने तेथे गर्दी होती.

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असणाऱ्या या तरुणाने मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले आणि धक्कदायक म्हणजे आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात कार मागेपुढे घेतल्याने अपघाताची तीव्रता वाढली आणि यात २ मजुरांचा मृत्यू झाला व सात जण गंभीर जखमी आहेत. मृत दोघांपैकी एक बालक आहे. (Nagpur Accident News)

Nashik Accident | नाशिकमध्ये पुन्हा एसटी अपघात; २० हून अधिक प्रवासी जखमी

आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तर, या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याचे आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. (Nagpur Accident News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here