Mumbai North West | ‘त्या’ निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप; सरकारी यंत्रणांच्या मदतीने निकाल फिरवला..?

0
16
Mumbai North West
Mumbai North West

Mumbai North West | लोकसभा निवडणुकीचा निकाल हा ४ जून रोजी जाहीर झाला आणि यात अनेक अनपेक्षित घडामोडी बघायला मिळाल्या. यात सर्वात जास्त चर्चेत राहिला तो मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल. येथे शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत रंगली होती. मात्र, निकालाच्या दिवशी प्रथम अमोल कीर्तिकर यांचा विजय जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालावर वायकर आणि शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला असता पुन्हा फेर मतमोजणी करण्यात आली आणि ४७ मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय झाला.

Mumbai Loksabha | ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात; राऊत बंधूंचा आंदोलनाचा इशारा..?

Mumbai North West | १९ व्या फेरीनंतर मतमोजणीत गडबड

मात्र, या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, याबाबत कोर्टात पेटीशन दाखल करणार असल्याचे आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. यावेळी अनिल परब यांनी १९ व्या फेरीनंतर मतमोजणीत गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला. तर, हा आमचा विजय होता. जो सरकारी यंत्रणांच्या मदतीने फिरवण्यात आला असून, ६५० मतांचा फेरफार करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. तसेच या विरोधात आम्ही लवकरच कोर्टात आमची बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Mumbai News | गुजराती रहिवाशांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना ‘प्रवेशबंदी’

तर, भाजपच्या ४० ही जागा आल्या नसत्या

दरम्यान, “इथून ही लढाई सुरू होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच देशातील भाजपच्या विरोधातील वातावरण पाहता २४० काय ४० ही जागा भाजपच्या आल्या नसत्या. मार, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून भजपला या जागा मिळाल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here