Dindori Lok Sabha Result | दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) आणि भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्यात थेट लढत असली. तरी या निवणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिले ते अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे (सर). शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असून, त्यांना भगरे सर म्हणून ओळखले जाते. तर, या निवडणुकीत भास्कर भगरे यांच्या नावाशी साम्य असलेले नाव असलेले बाबू सदू भगरे (Babu Bhagare) हे अपक्ष उमेदवार होते.
तर, त्यांचे निवडणूक चिन्हही ‘तुतारी’ हे होते. एवढेच नाहीतर बाबू भगरे यांच्या नावापुढेदेखील ‘सर’ लावण्यात आले होते. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट असून, या उमेदवाराला तब्बल 1 लाख 03 हजार 632 मतं मिळाल्याने हे डुप्लिकेट ‘भगरे सर’ चांगलेच चर्चेत राहिले. दरम्यान, आता निवडणूक झाल्यानंतर दिंडोरी लोकसभेचे अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे नाव, चिन्ह आणि सर लावल्यामुळे मतदारांचा गोंधळ झाल्याने ही अजब परिस्थिती निर्माण झाली. (Dindori Lok Sabha Result)
Dindori Lok Sabha Result | ड्यूप्लिकेट भगरे सरांनी घेतली ओरिजिनल भगरे सरांची मोठी मतं..?
Dindori Lok Sabha Result | हे बाबू भगरे नेमके कोण?
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवणुकीसाठी उभे असलेले डुप्लिकेट ‘भगरे सर’ यांचे नाव बाबू भगरे असे असून, ते केवळ तिसरी पास असल्याची माहिती समोर आली आहे. बाबू भगरे हे नाशिकमधील एकलहरे येथील ते रहिवासी असून, ते मोलमजुरी आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. तरीही त्यांच्या नावापुढे ‘सर’ असा उल्लेख का करण्यात आला.? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. बाबू भगरे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक आहे. मात्र तरीही दिंडोरीतील दोन्ही उमेदवारांना जोरदार टक्कर देत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवत बाबू भगरे हे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. (Dindori Lok Sabha Result)
तर, यांची चर्चा थेट राजकीय वर्तुळातही होत आहेत. तर, विशेष म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बाबू भगरे हे अपक्ष निवणूक लढवत होते. हे त्यांच्या शेजाऱ्यांनाही माहित नसल्याचेही समोर आले आहे. तर, मोलमजुरी करणारे बाबू भगरे हे निवणुकीत का उतरले..? एका तिसरी पास व्यक्तीच्या नावापुढे ‘सर’ का लावले..? आणि आता अचानक हे कोठे गायब झाले..? हा केवळ योगायोग की काही राजकीय डावपेच..? हे सर्व प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. (Dindori Lok Sabha Result)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम