Dindori Lok Sabha Election Result | ताईंचे देव पाण्यात, सरांची मोठी आघाडी; दिंडोरीत तुतारीच वाजणार..?

0
36
Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Election Result

Dindori Lok Sabha Election Result |  दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या चुरशीची लढत रंगली आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत ५०० मतांनी आघाडी घेतलेल्या भारती पवार आता सलग पिछाडीवर आहेत. तब्बल १८, ५०२ मतांनी भास्कर भगरे हे सातव्या फेरीअंती आघाडीवर आहेत. हा भाजपसाठी मोठा फटका मानला जात आहे.

Dindori Lok Sabha Election Result | दिंडोरीत तुतारीच वाजणार..?

हरिश्चंद्र चव्हाण हे तीन वेळेस या मतदार संघातून खासदार राहिलेले आहते. तर, गेल्या टर्मला भारती पवारांनीही भाजपचा हा गड राखला होता. मात्र, यंदा कांद्याने त्यांचा मोठा वांदा केल्याचे दिसत आहे. कांदा प्रश्न या मतदार संघासाठी निर्णायक ठरला असून, शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत आणि मतदार संघातही भारती पवार यांच्या उमेदवारीला मोठा विरोध होता. तर, माध्यमांच्या एक्जिट पोलनुसार दिंडोरीत तुतारीच वाजणार असल्याचे अंदाज वर्तविले जात होते. हा अंदाज खरा ठरताना दिसत असून, पहिली फेरी वगळता भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Loksabha Election Result | राज्यातील मतदारांचा महायुतीला ठेंगा; महाविकास आघाडी मोठ्या फरकाने आघाडीवर

एका नवख्या उमेदवाराकडून भारती पवारांना धोबीपछाड 

भारती पवार या केंद्रीय मंत्री असून, एका नवख्या उमेदवाराने त्यांना धोबीपछाड दिल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दिंडोरीची जागा ही भाजपचा बालेकिल्ला असून, येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, आठव्या फेरीअंती भास्कर भगरे हे १८, ५०२ मतांनी आघाडीवर आहेत. तर, नाशिक लोकसभेत ठाकरेगटाचे राजाभाऊ वाजे हे ९४, ७३५ मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, धुळ्यात डॉ. सुभाष भामरे हे आघाडीवर आहे.

Nashik Lok Sabha Result | नाशिक, दिंडोरीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीच आघाडी कायम 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here