Nashik Lok Sabha Result | गोडसेंना मोठा धक्का; पहिल्या फेरीत मशाल धगधगली

0
14
Nashik Lok Sabha Result
Nashik Lok Sabha Result

Nashik Lok Sabha Result | लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच नाशिक लोकसभा मतदार संघ हा चांगलाच चर्चेत राहिला. निवणूक काळातही राज्यभरात नाशिकचीच चर्चा होती. या मतदार संघात हायव्हॉल्टेज लढत पहायला मिळाली. दरम्यान, नाशिकच्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार गोडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापासून देवदर्शनाचा सपाटा लावला होता. तर, त्यांच्या कार्यकर्त्यांना गोडसेंच्या हॅट्रिकचा फुल्ल कॉन्फिडन्स होता. मात्र, आता हेमंत गोडसेंची हॅट्रिकचा धोक्यात असल्याचे दिसत आहे.

Dindori Lok Sabha | उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांचे देव पाण्यात; धाकधुक वाढली

Nashik Lok Sabha Result |  नाशिकमध्ये पहिल्या फेरीत मशाल पेटली

मध्यमांच्या लोकसभेच्या एक्जिट पोलमध्येही राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासूनच हेमंत गोडसेंची धाकधुक वाढल्याची चर्चा होती. तर, त्यांची हि भीती खरी ठरताना दिसत असून, पहिल्या देरीत विक्रमी १०, ७५२ मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये पहिल्या फेरीत मशाल पेटली असून, धनुष्यबाणाचे अस्तित्व धोक्यात असल्यचे दिसत असून, राजाभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Lok Sabha Election Result | राज्यात मविआ आघाडीवर; महायुतीच्या उमेदवारांची धाकधुक वाढली


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here