Maharashtra Exit Poll | कोण होणार नाशिकचा खासदार..?; बघा एक्झिट पोलचा अंदाज काय

0
45
Maharashtra Exit Poll
Maharashtra Exit Poll

Maharashtra Exit Poll | १ जून रोजी देशातील अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून, सर्वांना प्रतीक्षा आहे ती ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची.. या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. राज्यातील महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) लढतीत कोण बाजी मारणार याचा अंदाज मध्यमांकडून व्यक्त करण्यात आला असून, उत्तर महाराष्ट्रात कोण बाजी मारणार..? यावर एक्जिट पोलचा अंदाज काय..? हे बघूयात…

नाशकात ठाकरेंची मशाल चालणार..?

दरम्यान, टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची जागा असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीतून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse), महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात प्रमुख लढत होईत. यापैकी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हेच आघाडीवर असल्याचा अंदाज या एक्झिट पोलद्वारे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकचा गड राखण्यात महायुतीला अपयश येणार..? की ठाकरेंची मशाल चालणार..? हे येत्या ४ जूनला कळेलच… (Maharashtra Exit Poll)

Nashik Loksabha | याद राखा, लीड मिळाला नाही तर..; नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना महाजनांचा दम..?

ठाकरे गटाने अनपेक्षित धक्का देत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. तर, दुसरीकडे महायुतीत तब्बल महिनाभर या जागेवरून रस्सीखेच आणि नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. सर्वच पक्ष इच्छुक असल्याने अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. उमेदवारी मिळवण्यासाठीच हेमंत गोडसेंना मोठा संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्यांच्याकडे प्रचारासाठी केवळ २० दिवस शिल्लक होते. याचा मोठा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाला. त्यांना गोडसेंपेक्षा तब्बल एका महिन्याचा अधिकचा अवधी प्रचारासाठी मिळाला. या काळात राजाभाऊ वाजे यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला.

Maharashtra Exit Poll | राजाभाऊ वाजे यांना ‘या’ बाबींचा फायदा

ग्रामीण भागातील उमेदवार असल्याकारणाने वाजे यांचा शहरी भागाशी आमी शहरी मतदारांशी तसा फारकाही संबंध नाही. त्यामुळे ते शहरी भागात प्रचलित नव्हते. हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, यासाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते यांसारख्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली. मराठा समाजाचा पाठिंबा, तर साधी राहणी आणि उच्च विचार, अशी ओळख असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्यासाठी त्यांचा स्वभाव हादेखील एक मजबूत बाजू ठरल्याचे पहायला मिळाले. (Maharashtra Exit Poll)

Nashik Loksabha | नाशिक लोकसभेचे गणित..; कमकुवत, मजबुत बाजु आणि जनतेचा कौल..?

गोडसेंना अंतर्गतच बाजूचा फटका..?

यातुलनेत महायुतीचे हेमंत गोडसे यांना प्रचारासाठी मिळालेला कमी अवधी, मतदार संघात फारकाही चांगले वातावरण नसणे, त्यांचे कथित व्हायरल व्हिडिओ, भुजबळांना उमेदवारी न दिल्याने ओबीसी समाजाचा रोष, भाजपचा विरोध असल्याने स्थानिक आमदारांचाच पाठिंबा मिळाला की नाही याबाबत जरा शंकाच आहे. अजित पवार गटाचे आणि भाजपचेही स्थानिक पदाधिकारी हेदेखील प्रचारात फारकाही सक्रिय दिसले नाही. त्यामुळे अंतर्गतच बाजूचा फटका गोडसे यांना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता नाशिकचा गड कोण राखणार आणि कोण कोणाला पराभवाची धूळ चरणार..? हे येत्या काही तासांत स्पष्ट होईलच. (Maharashtra Exit Poll)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here