Dhule News | धुळे, नाशिक, दिंडोरी यासह मुंबईत उद्या २० मे रोजी राज्यात होणाऱ्या शेवटच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच धुळ्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून, यानुसार भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dhule News | नेमकं प्रकरण काय..?
या प्रकरणी, संबंधित पीडित अल्पवयीन मुलीचे लहान बहिण आणि भाऊ हे अंपळकर यांच्या ‘हर हर महादेव’ व्यायाम शाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात होते. या व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रितिका उर्फ दादू राजेंद्र राजपूत याने या पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला आणि “तू मला आवडते. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे” असे सांगून लग्नासाठी आग्रह केला. तसेच ऐकले नाही तर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
१० जानेवारी रोजी याच कारणावरून पीडित युवती, तिची आई आणि कुटुंबीयांना रस्त्यात अडवून पुन्हा त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच या पीडित युवतीशीही अंगलट येण्याचा संशयिताने प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड करत स्वतःची तिथून सुटका करून घेतली आणि त्या घरी जात असताना भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांनी त्यांनी पोलिसात न जाण्याबाबत धमकावले. मात्र, तरीही पीडित युवतीची बहीण आणि तिची आई या दोन्ही भावांसह चाळीसगाव रोड येथील पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. (Dhule News)
Dhule Crime | चिमुकला भाचा रडत होता; संतापलेल्या मामानेच भाच्याला संपवलं
पीडितेची आई व दोन्ही भावांना ताब्यात घेतले
त्यानंतर कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी पीडितेची आई व दोन्ही भावांना ताब्यात घेतले आणि त्यांना रिमांड होममध्ये ठेवले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा चाळीसगाव रोड येथील पोलिस ठाण्यात पोलिसांना विनंती केली. मात्र त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने या संदर्भात पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. याबाबत न्यायालयाने खातरजमा करून पोक्सोसह विविध कायद्या अंतर्गत संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.(Dhule News)
Dhule crime: पत्नीने प्रियकरासह पतीची केली हत्या, म्हणाली – मुलीवर होती घाणेरडी नजर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम