नवी दिल्ली : स्वाती मलिवाल मारहाण प्रकरणी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव यांना केजरिवाळ यांच्या घरातून अटक करण्यात आली असून, या प्रकरणी आता आम आदमी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावरून आता अरविंद केजरिवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आव्हान दिले आहे.
उद्या दुपारी १२ वाजता भाजप मुख्यालयात ‘जेल भरो’ आंदोलन
यावेळी आपचे संयोजक नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयासमोर उद्या रविवार रोजी ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते उद्या दुपारी १२ वाजता भाजप मुख्यालयात जाऊन अटकेची मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पंतप्रधानांनी हा ‘जेलचा खेळ’ सुरु केला असून, रोज एक एक नेत्याला विनाकारण अटक करण्याचे सत्र भाजपकडून सुरू आहे. त्यापेक्षा जी काही तुम्हाला अटक करायची आहे. ती एकदाच सर्वांना करा, असे आरोप केजरीवाल यांनी केले आहेत. तर, याबाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. (Arvind Kejriwal)
Arvind Kejriwal | केजरीवाल तुरुंगातून राजधानीचा कारभार चालवणार
भारतीय जनता पक्ष आम्हाला त्रास देत आहे.
या व्हिडिओत “आम आदमी पार्टीने दिल्लीत चांगलं काम केलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष आता आम्हाला त्रास देत आहे. यांच्याकडून एकेकाला जेलमध्ये टाकलं जात आहे. जनतेची कामं होऊ नये. लोकांना चांगल्या सुविधा मिळू नये. मुलांना चांगल्या शाळा, आरोग्य सुविधा यापासून ते वंचित राहावेत, असं त्यांना वाटत असेल. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकदाच अटक करा, असे केजरीवाल (Arvind Kejriwal) जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांना ते जमत नाहीये म्हणूनच भारतीय जनता पक्ष हा आम्हाला त्रास देत असल्याचा आरोपही यावेळी केजरीवाल यांनी केला आहे.
Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री केजरिवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय..?
Arvind Kejriwal | केजरिवाल यांचं ट्विट
दरम्यान, ट्विटमध्ये त्यांनी म्हटल आहे की, “मैं प्रधानमंत्री से कहना चाहता हूं की, आप ये जो ‘जेल का खेल’ खेल रहे हैं। कल मैं अपने सभी शीर्ष नेताओं, विधायकों, सांसदों के साथ दोपहर 12 बजे BJP मुख्यालय आ रहा हूं। आप जिसे चाहें जेल में डाल सकते हैं। प्रधानमंत्री जी, ये एक-एक करके क्या आप हम लोगों को गिरफ़्तार कर रहे हैं? एक साथ सभी को गिरफ़्तार कर लीजिए…”(Arvind Kejriwal)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम