Virar | मद्यधुंद महिलांचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण

0
61
Virar
Virar

विरार |  विरारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानुसार विरारच्या पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिप या परिसरातील ‘पंखा फास्ट’या  रेस्टारंट आणि बारमधून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. ‘पंखा फास्ट’या  रेस्टारंट आणि बारमध्ये तीन मद्यधुंद महिला आरोपींनी अश्लील भाषेत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांचा चावा घेतल्याची विद्रूप घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिन्ही महिला आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Virar | नेमकं प्रकरण काय..?

विरार (Virar) परिसरात पंखा फास्ट या  रेस्टॉरंट आणि बारमध्ये मद्यधुंद ३ महिलांनी दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घातला. याबाबत माहिती पोलिसांना कळवण्यात आले असता, काही महिला पोलीस आणि इतर पोलिस अधिकारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे या तिन्ही आरोपी महिलांनी पोलिसांसोबत वाद घातले आणि शिवीगाळ करत त्यांना दमदाटी केली.

Mumbai News | गुजराती रहिवाशांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना ‘प्रवेशबंदी’

या घटनेतील आरोपी महिलेने महिला पोलिसांच्या गणवेशाला पकडून त्यांना ओढले धक्काबुक्की करत त्यांच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला व हाताच्या कोपऱ्याला जोरात चावा घेत मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Virar)

तर, या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीने महिला पोलिसांचे केस ओढले. पोलीस अंमलदार उत्कर्षा यांना वाचवण्यासाठी आलेल्या या संबंधित रेस्टॉरंटमधील महिला सुरक्षा रक्षकासही धक्काबुकी केली व त्यांचाही टी-शर्ट फाडला. तर, तिसऱ्या आरोपी महिलेने त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ आणि दमदाटी करत धिंगाणा घातला.

लोखंडी बादलीने मारहाणमारहाण

याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी सांगितले की,”या महिला आरोपींनी पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यात आणि खांद्यावर लोखंडी बादलीने मारहाण करत दुखापत केली. तसेच त्यांनी मोराळे यांच्या डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले.  (Virar)

Mumbai Highcourt | मराठा आरक्षणावरून हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here