Hemant Godse | गेल्या कित्येक दिवसांपासून महायुतीत सुरू असलेला तिढा हा अखेर दोन दिवसांपूर्वी सुटला आणि काल हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या १० वर्षांपासून नाशिकचे खासदार असलेलया हेमंत गोडसेंना यंदा तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखल केल्यानुसार, नाशिकचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या नावे तब्बल सोळा कोटींची संपत्ती आहे. स्वतः हेमंत गोडसेंच्या नावावर 13 कोटी 38 लाख तर त्यांच्या पत्नी अनिता गोडसेंच्या नावे दोन कोटी 82 लाखांची संपत्ती असल्याची माहीती निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.(Hemant Godse)
Hemant Godse | साडे पाच कोटींचे कर्ज
तर, हेमंत गोडसेंवर साडेपाच कोटींचे आणि त्यांच्या पत्नीवर एक कोटी पाच लाखांचे कर्ज आहे. तर, विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत गोडसेंच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी त्यांची अचल संपत्ती हि सव्वासहा कोटींवरून सव्वापाच कोटींवर आली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(Hemant Godse)
Hemant Godse | उद्या आप्पा आणि ताईंचा अर्ज भरायला कोण कोण येणार..?
हेमंत गोडसेंच्या संपत्तीत वाढ
2019 च्या निवडणुकीवेळी हेमंत गोडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे साडेसहा कोटींची संपत्ती होती. तर, गोडसेंकडे तीन चारचाकी वाहने, व स्वमालकीची तसेच वडिलोपार्जित शेतजमिनीही आहेत. देवळाली कॅम्पला त्यांचे कार्यालय आहे. तर, संसरी व लॅम्प रोडला घर, व सदनिका आहेत. दरम्यान, पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 10 कोटींनी वाढ झाली आहे.(Hemant Godse)
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
सद्यस्थितीला गोडसे आणि कुटुंबीयांकडे पाच लाख सात हजार रोख रक्कम, चल संपत्ती 8 कोटी 8 लाख, अचल संपत्ती पाच कोटी 30 लाख आणि साडेपाच कोटींचे कर्ज आहे. पत्नीच्या नावावर दोन कोटी 29 लाखांची चल संपत्ती, आणि 53 लाख 21 हजारांची अचल संपत्ती आणि एक कोटी पाच लाखांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नुमद केलेले आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. तर विविध बँकांमध्ये ठेवी, बचत खात्यात रक्कम, सोने, शेअर्स यामध्येही चांगली गुंतवणूक केलेली आहे. (Hemant Godse)
Hemant Godse | भुजबळांच्या नावाची चर्चा अन् गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे रवाना
सूनबाईंच्या नावे इतकी संपत्ती
हेमनात गोडसेंच्या सूनबाई भक्ती अजिंक्य गोडसे यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्यांची संपत्तीही समोर आली असून, भक्ती गोडसेंच्या नावावर 19 लाख 73 हजारांची चल संपत्ती तर पती अजिंक्य गोडसेंच्या नावावर दोन कोटी 9 लाख रुपयांची चल संपत्ती आहे. अचल मालमत्ता त्यांच्या नावावर नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (Hemant Godse)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम