PM Narendra Modi | नाशिकमधून पंतप्रधान मोदी महायुतीचे उमेदवार..?

0
72
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi |  गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत चढाओढ सुरू असून, तिन्ही पक्ष या जागेवर निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. दरम्यान, एकीकडे काल महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी आपल्या प्राचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. आधी हेमंत गोडसे, छगन भुजबळ, आणि दिनकर पाटील हे इच्छुक होते. मात्र, छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजप आमदार राहुल ढिकले, आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चर्चा होती. (PM Narendra Modi)

दरम्यान, हेमंत गोडसे, बोरस्ते आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या मध्यरात्रीच्या खलबतांनंतर निवडणुकीसाठी कमी वेळ राहिल्याने कोणत्याही नवख्या उमेदवाराला संधी दिल्यास प्रचार वेळेत होणार नाही. हे लक्षात घेऊन हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित असतानाच, दुसऱ्या दिवशी प्रीतम मुंडे आणि भुजबळांच्या सूनबाई शेफाली भुजबळ यांचे नाव समोर आले. हे कमी की काय यानंतर शांतिगीरी महाराजांनी शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Nashik Lok Sabha | संकटमोचकांची गुप्त खलबतं; तर, भुजबळ फार्मवरही मोठ्या हालचाली

मोदी दोन जागांवरून निवडणूक लढवणार

रोज काहीतरी नवीन घडामोडी घडत असलेल्या आणि उमेदवाराबाबत उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या या नाशिकच्या तिढयात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला असून, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपकडून नाशिकचे उमेदवार असल्याची माहिती आहे. यापूर्वी मोदी यांची नाशिकमध्ये सभा झाली होती. त्यावेळीही या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा याबाबत माहिती समोर आली आहे. भाजपने पहिल्याच यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसीमधून उमेदवारी जाहीर केली असून, आता ते वाराणसीसोबतच नाशिकमधूनही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (PM Narendra Modi)

नुकत्याच झालेल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीचा मार्ग हा खडतर आहे. यामुळेच भाजपकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत असून सुत्रांनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात आहे.(PM Narendra Modi)

PM Modi | नाशिक प्रशासनाचा प्रताप; मोदींना गरीबी दिसू नये म्हणून, गरिबांना झाकले..

Nashik Lok Sabha | नाशिकच का..?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककडे विशेष लक्ष देत आहे. युवा महोत्सव नाशिकमध्ये ठेवून, त्याच्या उद्घाटनासाठी मोदींना नाशिकमध्ये बोलवणे हा त्याचाच भाग असल्याचेही बोलले जात आहे. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्याचा नक्कीच भाजपच्या वोट बँकवर परिणाम होणार असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक शहर म्हणून ‘नाशिक’ ओळखले जाते. याचमुळे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या धार्मिक नगरीतून मोदींनी निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षातून व्यक्त केली जात आहे.(PM Narendra Modi)

महाराष्ट्रात मोदी निवडणूक लढवणार म्हणून राज्यात त्यांचा प्रभाव पडेल आणि महायुतीच्या जागा वाढतील, हा भाजपचा प्लॅन असून, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी हा प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात हे सर्व स्पष्ट होईलच, मात्र असे झाल्यास नाशिकचा मोठा कायापालट होईल यात काही शंका नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here