Dhule Lok Sabha | काँग्रेसला बालेकिल्ला मिळणार की सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..? 

0
40
Dhule Lok Sabha
Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha | धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात त्यांच्या पक्षात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध झाला आणि मतदार संघातही त्यांच्याविरोधात नाराजी असल्याचे दिसून आले आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनीही त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली होती. (Dhule Lok Sabha)

त्यामुळे धुळ्यात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांत नाराजी नाट्य बघायला मिळाले. त्यानंतर पक्षांच्या वरिष्ठांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. यानंतर आता भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेस वर निशाणा साधला असून, “काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपले असले. तरीही जो पक्षच मुळात संपलेला आहे. त्याबाबत मी कायच बोलावं, अशी बोचरी टिका डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसवर केली.  (Dhule Lok Sabha)

Dhule Lok Sabha | धुळ्यात उमेदवार जाहीर होताच, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

Dhule Lok Sabha | .. त्यामुळे आपला विजय निश्चित  

तसेच “आपला प्रचार सुरू असून, मतदारांकडून आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळत आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करून भारताला आर्थिक महासत्ता करण्याचे भारताच्या जनतेने ठरवले असल्यामुळे आता आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.(Dhule Lok Sabha)

तर दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धुळ्यात काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघड झाले. मात्र, आता कुठे काँग्रेसमधील ही नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठांना यश आल्यानंतर महाविकास आघाडीतही सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शोभा बच्छाव यांचा प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील पक्षांतर्गत असलेली ही खदखद मतपेटीत दिसणार का..? किंवा या नाराजीचा परिणाम उमेदवाराच्या प्रचारावर होणार का..? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Dhule Lok Sabha | जातींमध्ये भांडणं लावली, कमिशन घेतले; ड्रायव्हरही करू शकतो भामरेंचा पराभव..?

काँग्रेसला बालेकिल्ला मिळणार की सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..? 

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपासून धुळे लोकसभा मतदार संघावर भाजपचा उमेदवार निवडणूक येत असला, तरी याआधी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तर, गेल्या दोन टर्मपासून डॉ. सुभाष भामरे हे निवडणून येत असून, यंदा ते हॅटट्रिकच्या करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे मविआकडून काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे नाव समोर आले होते. (Dhule Lok Sabha)

मात्र, त्यांना डावलून अचानक धुळ्याच्या प्रभारी असलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज असलेल्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. दरम्यान, आता कुठे काँग्रेसमधील ही अंतर्गत नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठांना यश आल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी हे उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा बळकावणार की डॉ. सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..? हे पहावे लागणार आहे.  (Dhule Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here