Dindori Loksabha | दिंडोरीत आघाडीत बिघाडी; गावितांचा शरद पवारांना थेट इशारा

0
58
Dindori Loksabha
Dindori Loksabha

Dindori Loksabha |  नाशिकनंतर आता दिंडोरी लोकसभा मतदार संघात नाराजी नाट्य सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना संधी दिली असून, यामुळे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज होते. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवतील, अशा चर्चा सुरू होत्या. तर, यानंतर आता दुसरीकडे शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या भास्कर भगरे यांनाही महाविकास आघाडीतूनच विरोध होत असून, माकपचे माजी आमदार जे.पी गावीत यांनी यावरून थेट शरद पवारांना इशाराच दिला आहे. (Dindori Loksabha)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून  माकपचे माजी आमदार जे पी गावीत हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आधीपासूनच ते या जागेसाठी आग्रही होते आणि महाविकास आघाडीकडे  दिंडोरीची जागा माकपला द्यावी अशी मागणीही त्यांनी शरद पवारांकडे केली होती. मात्र, असे असतानाही महाविकास आघाडीने शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे जे पी गावित नाराज असून, त्यांनी जाहीर सभा घेत त्यांना शरद पवारांना थेट इशारा दिला आहे. यावेळी उमेदवार बदला अन्यथा तुमच्या उमेदवाराला पाडू असा इशाराच त्यांनी दिला. यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. (Dindori Loksabha)

Dindori Loksabha | दिंडोरीच्या इच्छुक उमेदवारांनी घेतले नाशिकच्या इच्छुक उमेदवारांचे आशिर्वाद

Dindori Loksabha | गवितांची मागणी काय..?

महाविकास आघाडीचा दिंडोरी लोकसभेतील उमेदवार बदला. इंडिया आघाडीने दिंडोरी लोकसभेची ही जागा माकपला द्यावी. नाहीतर तुम्ही दिलेला उमेदवार पडणारच, असा इशारा गावीत यांनी शरद पवारांना दिला आहे. महाविकास आघाडी किंवा माकपनेही उमेदवारी न दिल्यास गावीत हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.(Dindori Loksabha)

“दिंडोरी लोकसभेची जागा आपण नक्कीच जिंकू. अजून मतदानाला एक महिना बाकी आहे.  6 – 7 लाख मतं जमवायला काही वेळ लागणार नाही. त्यांच्याकडे केवळ चार-पाच कार्यकर्ते सोडले तर बाकी कुणी नाही”, असा खोचक टोला त्यांनी भास्कर भगरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. दिंडोरी येथे जाहीर सभा घेऊन गावीत यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, गावीत यांच्या या सभेला मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. (Dindori Loksabha)

Dindori Loksabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं चाललंय तरी काय ?

त्यासाठी आमच्यासारखे नेते संसदेत गेले पाहिजे 

भाजप सरकार हे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असून, त्यासाठी आमच्यासारखे नेते हे दिल्लीत संसदेत गेले पाहिजे. इथून जे जातात ते तिथं गेले की शांत बसतात. रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. द्राक्ष व कांद्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत. ही जागा इंडिया आघाडीने आम्हाला द्यावी, अशी आमची मागणी अजूनही आहे. शरद पवारांनी हे लक्षात ठेवावे नाहीतर तुमचा उमेदवार मी पडतोच आहे. आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार नक्कीच निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Dindori Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here