सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसून, यासंदर्भात मध्यंतरी वृत्तपत्रात व सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बातम्या या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऱ्या असल्याचा खुलासा चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
आमदार डॉ. आहेर यांनी या पत्रकात म्हटले आहे कि, आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत माझी तयारी असल्याच्या बातम्या सर्वत्र जाणीवपूर्वक पसरविल्या जात असून, हा नागरिकांध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकही नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
Lok Sabha Election | ‘या’ नेत्यांसाठी निवडणूक अवघड; राऊतांनी केले भाकीत..?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर आमदार डॉ. राहुल आहेर हेही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा मेसेज समाज माध्यमांमध्ये पसरवून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे.
आपण लोकसभा निवडणुकीसाठी कधीही इच्छुक नव्हतो व आताही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. चांदवड-देवळा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात अनेक विकासकामे केली असून, विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही चांदवड-देवळा मतदार संघातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच विकासाचा रथ पुढे नेणार असल्याचे शेवटी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या पत्रकात म्हटले आहे.
Nashik Loksabha | नाशिकची जागा शिवसेनेलाच; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम