Deola | थकीत मानधन द्या, अन्यथा उपोषण; देवळा पोलीस पाटील संघटनेचा इशारा

0
16
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुक्यातील कामगार पोलीस पाटील यांचे गेल्या सात महिन्यांपासूनचे मानधन थकीत असून ते त्वरित द्यावे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देवळा तालुका पोलीस पाटील संघटनेने दिला आहे. पोलीस खात्याला कायमच सहकार्य करीत गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. म्हणून कामगार पोलीस पाटील हे कार्यरत असतात. तंटामुक्तीसाठी ते आपली भूमिका चोख बजावतात, असे असूनही शासनाने गेल्या सात महिन्यांपासून त्यांना मानधन दिलेले नाही.

Deola | निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यात मतदान जनजागृती कार्यक्रम

त्यामुळे पोलीस पाटील संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश पोलीस पाटलांची आर्थिक परिस्थिती ही सामान्य आहे. उदरनिर्वाहासाठी हे मानधन गरजेचे असते. त्यांना त्वरित मानधन देऊन दिलासा द्यावा. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देवळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गुंजाळ, यांच्यासह योगेश पाटील, अनिता आहेर, भगवान जाधव, भारत जगताप, दिगंबर सोनवणे, लक्ष्मण माळी, दौलत जैन यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

Deola | शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेस ६० लाख ७० हजार रुपयांचा नफा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here