Shrikant Shinde | मंत्री भुसे आणि श्रीकांत शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

0
19
Shrikant Shinde
Shrikant Shinde

Shrikant Shinde |  जिल्ह्यातील सुरगाणासारख्या आदिवासीबहुल भागातील गावांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ मिळत आहे. त्याअनुषंगाने विविध विकासकामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. सुरगाणा नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुहास कांदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Shrikant Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 कोटी रुपये निधी सुरगाणा शहराच्या विकासासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त करुन पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, विकास कामांमधून सुरगाणा शहराच्या नागरिकांना दर्जेदार सुविधा प्राप्त होणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सुरगाणा परिसरातील स्मशानभूमीच्या विकासासाठी व सुविधेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी शासन काम करत आहे. तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाभ नागरिकांना दिला आहे. महिलांसाठीही विविध योजना शासन राबवित असून त्याचा लाभ महिला मोठ्या प्रमाणात घेत आहे, असे खासदार श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.(Shrikant Shinde)

Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा

या विकासकामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

प्रभाग क्र.०१ मध्ये मनोज सोनवणे ते लहरे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार रु. ६० लक्ष, प्रभाग क्र.०१ मध्ये पेवर ब्लॉक बसविणे. रु.५० लक्ष, प्रभाग क्र.०२ मध्ये पेवर ब्लॉक बसविणे रु.२० लक्ष, प्रभाग क्र.०१ व ०२ मध्ये पेवर ब्लॉक बसविणे, रु.१० लक्ष, प्रभाग क्र.०३ मध्ये नुरी हॉटेल ते राभाऊ गावित यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार. रु. ६० लक्ष, प्रभाग क्र.०३ मध्ये खुरकुटे साहेब ते पी. जी. चौधरी यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार, रु. ५० लक्ष, प्रभाग क्र.०३ इब्राहिम बेलिफ ते गांगुर्डे पोलीस यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार. रु. ६० लक्ष, प्रभाग क्र.०५ मध्ये भुयारी गटार बांधणे. रु.१० लक्ष, प्रभाग क्र.०६ मध्ये दुर्गादेवीमंदिरासमोर पेवर ब्लॉक बसविणे.

रु.३० लक्ष, प्रभाग क्र.०६ मध्ये पांडू गायकवाड ते चांगुणा डंबाळे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे. रु.१० लक्ष, प्रभाग क्र.०६ मध्ये दुगादेवी मंदिर येथे ग्रीन जिम बसविणे. रु.१० लक्ष, प्रभाग क्र. ०६ मध्ये माधव गांगुर्डे ते धर्मा पवार यांच्याघरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार. रु. २५ लक्ष, भाग क्र.०६ मध्ये अंतर्गत रस्ता करणे. रु. १० लक्ष, प्रभाग क्र. ०७ व ०८ मध्ये पेवर ब्लॉक बसविणे. रु. १० लक्ष, भाग क्र.०७ ठाकरे साहेब ते भोये यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार. रु. ३० लक्ष, प्रभाग क्र.०८ राजस्थान हॉटेल ते वाघसाहेब यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार. रु. ५० लक्ष, प्रभाग क्र. ११ मध्ये अपना बेकरी ते होळीचौक काँक्रीट रस्ता रु. २५ लक्ष, प्रभाग क्र.१२ राजु सावकार किराणा ते नजिर शेख यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार. रु. ५० लक्ष, प्रभाग क्र.१४ मध्ये पाण्याची पाईपलाईन करणे.(Shrikant Shinde)

Dada Bhuse | मंत्री भूसेंच्या प्रयत्नांना यश; राज्यातील यंत्रमागांना वीजदर सवलत

प्रस्तावित विकास कामे-

१) सुरगाणा शहरासाठी नविन नळ पाणी पुरवठा योजना. रु. २२ कोटी, २) मा. नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, शॉपींग कॉम्प्लेक्स बापणे. रु. २.५ कोटी, ३) सुरगाणा नगरपंचायत नवीन प्रशासकीय इमारत बांधणे. रु. २ कोटी, ४) प्रभाग क्र.१२ लताबाई चाफळकर ते गांगुर्डे पोलीस यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे. रु.५० लक्ष, ५) प्रभाग क्र.०३ सुकराम ठाकरे ते सिताराम चौधरी यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे. रु.५० लक्ष, ६) प्रभाग क्र.०८ भास्कर पवार ते एस. के. चौधरी यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे. रु.३५ लक्ष, ७) प्रभाग क्र.०६ मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर रस्ता काँक्रीट रस्ता व सुशोभिकरण करणे.

रु.५० लक्ष, ८) प्रभाग क्र.०३ खुरकुटे साहेब ते चौधरी साहेब यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे. रु.५० लक्ष, ९) प्रभाग क्र.०१ व ०२ देवीपाडा चौक सुशोभिकरण करणे. रु.५० लक्ष, १०) प्रभाग क्र.०३ रामभाऊ गावित ते किसन थविल यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे. रु.५० लक्ष, ११) प्रभाग क्र.०३ मध्ये किरण परदेशी घरासमोरील नाल्यावर पाईप टाकणे, रु.१५ लक्ष, १२) प्रभाग क्र.०४ मध्ये नुरी हॉटेल ते सुनिल गायकवाड यांच्या घरापर्यंत भुयारी गटार करणे. रु.१० लक्ष, १३) प्रभाग क्र.०६ मध्ये सभामंडप बांधणे, रु.४० लक्ष, १४) प्रभाग क्र १४, १५ व १६ मध्ये स्वतंत्र सिमेंट काँक्रीट पाण्याची टाकी करणे. रु. ३० लक्ष, १५) प्रभाग क्र.०१ व ०२ पाझर तलाव सुशोभिकरण ६५ लक्ष, १६) नगरपंचायत हद्दीतील गट क. ५१ मधील डम्पींग ग्राऊंडला वॉल कंपाऊंड करणे.(Shrikant Shinde)

रु.५० लक्ष, १७ ) प्रभाग क्र.१२ मधील बेबीबाई महाले घराबाजुच्या नाल्याचे बांधकाम करणे. रु. ३० लक्ष, १८) प्रभाग क्र.३ मधील कब्रस्थानमध्ये पॅव्हर ब्लॉक बसविणे, रु.३५ लक्ष, १९) प्रभाग क्र. ३ मधील कब्रस्थानमध्ये सौर पथदिप बसविणे. रु.१० लक्ष, २०) प्रभाग क्र.०३ मध्ये पथदिप बसविणे. रु.१० लक्ष, २१) प्रभाग क्र.१२ मध्ये स्व मुस्ताकभाऊ शाह चौक शुशोभिकरण करणे रु १५ लक्ष, २२) प्रभाग क्र. ३ मधील मशीद मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे रु.१० लक्ष, २३) सुभाष राऊत ते सुधाकर भोये सर यांच्या परापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे रु.५० लक्ष, २४) प्रभाग क्र. ०७ मध्ये जि. प. शाळा नं.०१ ते उत्तम वाघमारे याच्या परापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे रु.७० लक्ष, २५) प्रभाग क्र. ०७ मध्ये खोकरतळा विहीर ते भास्कर पवार याच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता व भुयारी गटार करणे रु.३० लक्ष, २६) प्रभाग क३ मधील कब्रस्थानला बॉल कपाऊड करणे रु ६० लक्ष,२७) प्रभाग क्र.१ व १७ मध्ये ठिकठिकाणी भुयारी गटार बाघणे रु.५० लक्ष.(Shrikant Shinde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here